पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धरूनि वाजवितोसि निश्वसनधंसा ।। तरि येथे पाहिजे अहिंसा ।। तेव्हां चि हरिदर्शनें होसील हिंसी । अंगीकारावी उत्तरमीमांसा ॥ "शीर्णपर्णानिलाहारे शष्क करावे स्वदेहमांसा ।। सांसारिक दुःख विध्वंसात्यालागिं आत्मप्रशंसा || विवर्जित परमहंसाचिया पादपांसामाजि सांसारिक जनरहित असावे ।। केवळ विविक्तदेशी संत्यक्तदुर्वासनारचितमृदुआसनावरी मैयादिवासनायुक्त हरिउपासना करित बसावे ।। ब्रह्मादिभुवन भोगी रुसावे ।। यदृच्छालाभ संतुष्ट द्वंद्वातीत विमत्सरपणे विलसावें ।। अमानित्वादि साधने भगवद्गीतेसी पुसावे ।। अंतर्बाह्य वैराग्य भाग्यमानी योग्य सदाचरणे मनास कसावे ।। दुराग्रह वितंड वाद न करूनि सच्छास्त्र सद्गुरुवाक्य परिसावे ।। तीियभागउर्वरीत शार्वरीत उठावे । निर्लज्जपणे चित्त वठावे ।। ब्राह्म मुहूर्ता पासुनि शय्यासनस्थ नित्य परीक्षा परब्रह्म वस्तु अनुभवुन सहस्त्र दळपंकजी सद्गुरुध्यान मानसपूजन आजपाजपानंतर प्रातःस्नान संध्या ब्रम्हसनातन जप करूनि यथापद्धति वैदिक तांत्रिक मिश्रित परमेश्वरार्चन आरंभावें ॥ पुरुष. सूक्तोक्त षोडशोपचारे ययापद्धति लब्धोपचारे तन्मयतेने शैली दारुमयी लेयालेख्या सकैती सूर्यमंडळी जळी स्थळी अष्टमार्तस्वरूप श्रीहरिस पुजावें ।। स्वस्तिकासनि निमीलिताधरावियोगी दंतपंक्ति अस्पष्टरशनासमंकीयशिरोनावं अर्धोन्मीलित नेत्र तत्परमुद्राधृत हत्कमलीं महाविष्णुचे ध्यान धरावे ।। चरणकमळी नाभिकमळ कमळमाळामंडित हस्तकमळी मुखकमळी नेत्रकमळ हा विमळ कमळविग्रहा भक्त मनोभ्रमर जीवन साधक नेत्र षडद्वंद्वाराम सजल जलदश्याम कनक मुकुट कनकहार कनककुंडल कनककेयूर कनककटक सौंदर्य कटकाकति अकपट अति निकट कनकवृष्टिकारक परम प्रसन्न ईषद्वास्य वरदानाभिमुख चतुर्भुज शंखचक्रगदापापीतांबरधर आपादलंबिनी वनमाला || कालत्रयाबाधित सत्यज्ञानानंदकमुर्तीच्या एकैका अवयवीं चित्त स्छिर करित जावे ।। शनैः शनैः अजितरूप । चितावे ॥ चिंतितां चिंतितां नखशिख चितावे "स्वेद रोमांच वाक् गदगदादि भगवत्प्रेमानंदममतेने साक्षात्कारे सकलमनोरथसिद्ध होउनि निजानंदपदी पावावें ।।। ऐसा बहु बहु प्रकारे सज्जनसांप्रदाये शिक्षिला ।। मग दीक्षाधिकारार्थ पूर्णकृपा ६०. हिसा-थंड गार.६१. शीर्ण-सुकलेले. ६२. अनिल वारा, ६३. परमहंससंन्यासी. ६१. पांस-धूळ. ६५. विविक्त एकांत.६६. यदृच्छालाभ नशीबाने होणारा लाभ. ६७. द्वंद्वातीत-सुखदुःखादि जाड्यरहित. ६८. तातीय तिसरा. ६:. उर्वरीत . शिल्लक. ७०. शार्वरी रात्र. ७१. ब्राह्ममुहूर्त-पहाट. ७१. पंकज-कमल. ७३. सनातन -शाश्वत. ७१. शैली दगडाची. ७५. दारमयीलांकडाची. ७६. लेप्य-चित्र. ७७. सैकत-वाळवंट. ७८. निमीलिताधर-मिटलेले ओर. ०९. काय-शरीर. ८.. ग्रीना=मान, कंड. 42. स्वेद-घाम.