पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अमृतरायकृत कंटका ।। स्वधर्म स्थापुनियां नेटका ।। स्वार्जित राज्याच्या पादुका ।। पायीं घालिल दिसताहे ॥ ७ ॥ येथे बहुत फार कष्टलो ।। नाना दुःखांही वेष्टीलो ।। ब्रह्मानंदांतुनी भ्रष्टलों ॥ होईल लाभ तेथेहो ॥ ८॥ ब्राह्मण ब्रह्मनिष्ट भवताले ।। राम दर्शनाते आले ।। भगवञ्चर्या करूनि जाले । ब्रह्मानंदी निमग्न ॥ ९॥ तेथे चांगला एकांत ।। निवळ होताहे वेदांत ।। क्षणभरी करूं चला विश्रांत ॥ हा रटधंदा सोडुनियां ।। १० । रामे सोडुनि दिधला कोप ।। जटा गुंडाळुनि केला टोप | केवळ वैराग्याचे रोप ।। अक्षय्य शरीर रामाचे ।। ११ ।। करूनि पर्णकुटीची मठी ।। भगवी ध्वजा उभवी गुढी ।। नाहीं चोपदार देवडी ।। दाही दिशा मोकळ्या ।। १२ ।। जवळी नाही मणी फटका ।। तेथे कैचा जरीपटका ।। हा तव परमार्थ नेटका || विवेकासी आणिला ॥ १३ ॥ सेवक अमृत राय भगवान ॥ त्याला अखंड हें चि ध्यान || आपले जातीचे महिमान ।। ज्याला , त्याला आवडे ॥ १४ ॥ २१ ॥ अखंड हरि हरि वदा बापानों || किति सेवाल धनदुर्मदा ॥ ध्रु० ॥ काय वाटसा न मिळती चिध्या ।। काय भोपळा न मिळे दध्या ।। काय सृष्टीत आटल्या नद्या । गली घडि आजिची नये उद्यां ॥ १ ॥ काय सांडोनि गोष्टी खऱ्या ।। काय दुष्काळ पडिला कया । काय महर्ग तणाचा बोया ।। ह्या तो शुकाच्या गोष्टी बन्या ॥ बापानो० ॥ २॥ काय लोकी दारोठे रोधिले ॥ काय न घालता चार जोधळे ।। काय ग्रामांत नसती देउळे ।। नका सेऊं दर्मद आंधळे रबा० ॥ ३ ॥ बाहु असतां आपणापाशी ॥ तेथे कशास पाहिजे उशी || काय अडचण महदाकाशी ॥ काय पृथ्वी ठाव नेदी कशी ।। रे बा० ।। ४ ।। कर नोडुनि अमृत विनवितो ॥ भुज उभारोनी गर्जतो ॥ जो निश्चय धरोनि बैसतो ॥ त्यासी बसले ठायीं देतो ॥ रे बापानो अखंड ० ॥ ५ ॥ २२ ॥ वैराग्यभाग्यासारिखें भाग्य नाहीं ॥ ५० ॥ परि तो विवेक मुख्य असावा ।। साधनमात्रालागि विसावा ।। संतसमागम वसावा ।। संशय सकळ पुसावा ।। किमाप नसावा कांहीं ॥ १ ॥ चिंध्या चिरगटांची भरती ।। ममता सारुनी परती ।। देहींची दुःखे साहीं ॥ २ ॥ डोइस टोपी की चिंदोटी ॥ गडवा पुरे एक लंगोटी ।। समयी भाकरटुकडा रोटी || वस्ती पर्णकुटीत || हरि हरि जपूनी राहीं ॥ ३ ॥ हत्ती घोडे पालख्या उंटें ॥ त्याचे मागे उदंड झटे । कारभाराचे व्यसन खोटें ।। जैसे फुटके पेटे ।। बुडविती मध्यप्रवाहीं ॥ ४ ॥ सेवक अमृतराय संतांचा ॥ हा चि पूर्ण मनोरथ त्याचा ।। अर्पित काया मन वाचा ॥ अंतर्बाह्य साचा ॥ यास विठ्ठल रुक्मिणी पायी ॥ ५ ॥२३॥ ३८. बोन्या-चाई, हांतरी.