पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१८३) निद्रा आळस जरि टाळी उमजे भवभुजंग वेंटाळी ॥ ४ ॥ अमृत कीर्तनी संसाराची फार करि हेटाळी ।। ५ ।। १८ ।। उंदीर देखुनि वचके ।। तैसा काळालागी न दचके | १ ।। म्हणउनी हरि भनिने हरि भजिजे । पदोपदी संस्मरिजे ।। ध्रु० ॥ दाटती कंठ कफाने । नाना देहीं उठती तुफाने ।। २ ।। वरडुनि घाबरे करिती ।। असली सुबुद्धि ते ही हरिती ।। ३ ॥ समयी म्हणती पैका वैचू ।। अंतरिं सहस्र तिडका विंचू ।। ४।। लागली देखुन उचकी ।। स्त्रीसुतबंधु पैका उचकी ॥ ५ ॥ कंठी कुडक्या मुद्या ।। अवधी संपत्ति जाईल उद्यां ।। ६ ।। अमतेविण मति बरळा || अंतरिं सावध तो एक विरळा ॥ ७॥१९॥ हरि तू येयि रे दासासि दर्शन देई रे ।। ध्रु० ॥ हें वय व्यर्थ चि गेले पाही रे || या संसारी सार्थक नाही रे ।। संचित मजला न दिसे काही रे ॥ हरि तूं ये० ॥ १॥ आस तुझी धरि कास निरंतर निशिदिनि सन्निध राही रे ॥ हरि० ।। सजाणा जातीचा कसाई रे ।। सेना सद्वंशीचा नाही रे॥ तेथें तंव न विचारिले काही रे || त्याचा वैपनी पुरस्कर होउनि नृपतीची डोई त्वां केलीस नाही रे ॥ हरि ० ॥ २ ॥ शबर किरात कोण बढाई रे ।। तेथ वनांत वनफळ खाई रे ।। भाविक श्रीदामोदर राही रे ॥ अघमर्षण मिसे कुणबटे सेतांत बांधिलासी नाही रे ।। हरि ० ॥ ३ ॥ नामा सुनात शिंपीभाई रे । नेणों त्याची किती कमाई रे॥ कैसा जालासी सुखदायी रे ।। संपादुनि लौकिक तया घरी दुध प्यालासि नाही रे ।। हरि० ॥ ४ ॥ हरि तुझी काय वदूं चतुराई रे । तुजला उत्तम मध्यम नाही रे ।। आपुले चित्ती विचारुनि पाही रे || अमृतरायावरि कृपाळू जालास तरि गांठडि तुझी काही गेली नाही रे ॥ हरि० ॥ ५॥ २० ॥ राम गोसावी की जाहला अवघे मिळोनि पाहूं चला ॥ध्रु० ॥ कादनि मोतीयाची आंगी ।। दिव्य विभूति लावी आंगीं ।। जैसा भव्य पुरातन जोगी ।। शरयतीरी बैसला ॥ १ ॥ फेंकूनि दिल्ला बादली चीरा ।। वाटिला मोतियांचा तुरा || फेडुनि पिवळ्या पीतांबरा ।। वनीं वल्कले नेसला ॥ २ ॥ अतां होऊनि बेजार || काढी किनखापाची वीजार ।। जैसी जुनी तुटकी पैजार ।। तैसे राज्य झुगारिले ॥ ३ ॥ धाडुनि लक्ष्मणा सुभटा || चीक आणिला प्राथुनि वटा ।। मऊ केशाच्या केल्या जटा ।। दिव्य तांबड्या धगधगीत ॥ ४॥ उदास होऊनी सुवर्णनगी ।। सन्निध सीता बैसली उगी । भेटीस नलगे परवानगी । उघडे दर्शन चांगले ॥ ५॥ भरते समाते विनवीले ॥ त्यासी पादुका भाग्य. दिल्हें ।। चौदा वर्षे राज्य भले । करितील आतां पादुका ॥ ६ ॥ मर्दुनि रावणा ३६. वपन-हजामत. ३०. अघमर्षण पापनाश.