पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१८२) अमृतरायकृत यै थै सह गायन ऐकोले ॥ २॥ भय नय रयें गत मनहैये फिरवनि अविनय तनय तनय आट हे चेवले ॥ ३ ॥ अव्यय विसरुनि नरतनु व्यय कृत अमृतम्हणे जय जय हरि हरवीलें ॥ ४ ॥ १३ ॥ जय जय श्रीकृष्णा श्रीकृष्णा ।। दूरी करि भवतणा ।। ध्रु० ॥ तुझी कथा सत्संगति गंगा यमुना वेण्या कृष्णा ।। १॥ शरयू तापी भीमा गोदा रेवा दिव्य पयोष्णा ॥ २ ॥ परम संकटी वस्त्रे पुरखुनि बहिण रक्षिलीणा ।। ३ ।। अमृत तिघां कृष्णांते वंदित व्यास कृष्णा नर कृष्णा || १ ॥ १४ ॥ भजा वो अंजनीसुत बलभीम ।। ध्रु० ॥ हा भूगोल सैषपत्तम तोलित गणकु मुकोम ॥ १ ॥ बळ अद्भुत पावुनि रत चरणीं । कुंतीचा सुत भीम ॥ २ ॥ यवनोत्कर्ष न साहे म्हणुनी ।। बाटवि फार गनीम ॥ ३ ॥ श्रीहनुमंत अखंड जपावा ।। करुणाकर निःसीम ॥ ४ ॥ अमृत म्हणे निशिदिान तो गावा ।। अक्षय हा चि उदीम ॥ ५ ॥ २५ ॥ राम गावा हो सच्चित्सुख आत्मा ।। धु० ॥ अमल कमलसम मल चरणिं मन रमल तरि च भव शमल हो ॥ १॥ विदेषमान्य शरधनुष्यधरण कलिकलवहरण एक निमिषभर गाहो ॥ २ ।। कुवलयनयनि सित पिवळे दिसते घनसांवळे म्हगुनी मनिं कवळुनि घ्या हो ।। ३ ।। गीता उपदेशित भयभीता पीतांबरधर सीतानाहो ॥ ४ ॥ लक्ष्मणसहित सुलक्षण क्षणभरि अमृतमधुरगुणगण ऐका हो ।। ॥ ५ ॥ १६ ॥ बसुनि सुखे चितित जा रघुवीर || ध्रु० ॥ अल्प सुखास्तव व्यर्थ विकुं नका क्षणिक अमूल्य शरीर ।। १ ।। चित्रगुप्त वरदास्त लिहितसे विषयाची तकरीर ॥ २ ॥ हरिभजने कामादिक लपती मोठे सबळशरीर ॥ ३ ॥ गुणलखक मोहरीर" अमृत घरि बसल्या देत हरीर ॥ ४ ॥ १७ ॥ वाजवि करताळी करताळी || गाउनि मृदंगताळी ॥ ध्रु० ॥ इहलोकीं सुख पावुनि जाउनि श्री हरिपद कौटाळी ॥ २ ॥ श्रीहरिचे गुण गातां पळती दुःखाची पेटाळी ।। २ ।। लाउनि बसणे टाळी परि मन जयासि जन हो टाळी ।।३।। १८.नय-न्याय. १९. रयम्वेग. २०. हय-घोडा. २१. अव्यय-ज्याचा नाश होत नाहीं असा. २२. भवतृष्णा संसाराची आसक्ति. २३. रेवा-नर्मदा. २४. कृष्णा द्रौपदो. २५. सर्षप-मोहरी. २६. गनीम शत्रु. २७. अमल-स्वच्छ. २८. यमल-जुळे. (रामलक्ष्मण) २९. विदुष-बिद्वान, ३०. कलुष पाप. ३१. निमिष-अत्यल्प काळ. ३२. कुवलय-कमक. ३३. सित-पांढरें. ३४. नाहो नवरा. (सं० नाथ). ३४. a. तकरीर खोटा आरोप. ३५. सबळशरीरबळकट आहे शरीर ज्यांचे असे (कामादिक), ३५. 2. मोहरीर देशपांडयाचा गुमास्ता.