पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पढ़े. (१८३) निद्रा आळस जरि टाळी उमजे भवभुजंग वेंटाळी ॥ ४ ॥ अमृत कीर्तनी संसाराची फार करि हेटाळी ।। ५ ॥ १८ ॥ उंदीर देखुनि वचके ।। तैसा काळालागी न दचके ॥ १ ॥ म्हणउनी हरि भनिने हरि भजिजे पदोपदी संस्मरिजे ।। ध्रु० ॥ दाटत्ती कंठ कफाने । नाना देहीं उठती तुफाने ।। २ ।। वरडुनि घाबरे करिती ।। असली सुबुद्धि ते ही हरिती ।। ३ ॥ समयीं म्हणती पैका वेचू ।। अंतरिं सहस्र तिडका विंचू ।। ४।। लागली देखुन उचकी ।। स्त्रीसुतबंधु पैका उचकी ।। ५ ।। कंठी कुडक्या मुद्या ।। अवधी संपत्ति जाईल उद्यां ॥ ६ ॥ अमृतेविण मति बरळा ।। अंतरि सावध तो एक विरळा ॥ ७॥ १९॥ हरि तू येयिं रे दासासि दर्शन देई रे ।। ६० ।। हे वय व्यर्थ चि गेले पाही रे ।। या संसारी सार्थक नाही रे ।। संचित मजला न दिसे कांहीं रे ॥ हरि तूं ये० ॥ १॥ आस तुझी धरि कास निरंतर निशिदिनि सन्निध राही रे ।। हरि० ।। सजाणा जातीचा कसाई रे ।। सेना सदशीचा नाही रे॥ तेथे तंव न विचारिले काही रे ॥ त्याचा वैपनी पुरस्कर होउनि नृपतीची डोई त्वां केलीस नाही रे ।। हरि ० ॥ २ ॥ शबर किरात कोण बढाई रे ।। तेथ वनांत वनफळ खाई रे ।। भाविक श्रीदामोदर राही रे ।। अघमर्षण मिसे कणबट सेतांत बांधिलासी नाही रे ॥ हरि० ॥ ३॥ नामा सुनात शिंपीभाई रे । नेणों त्याची किती कमाई रे ॥ कैसा जालासी सुखदायी रे ॥ संपादुनि लौकिक तया घरी दुध प्यालासि नाही रे || हरि० ॥ ४ ॥ हरि तुझी काय वढूं चतुराई रे ॥ तुजला उत्तम मध्यम नाही रे ।। आपुले चित्तीं विचारुनि पाही रे ।। अमृतरायावरि कृपाळू जालास तरि गांठुडि तुझी काही गेली नाही रे॥ हरि० ॥ ५॥ २० ॥ राम गोसावी की जाहला अवघे मिळोनि पाहूं चला ॥ ध्रु० ॥ कादुनि मोतीयाची आंगी ।। दिव्य विभूति लावी आंगीं ।। जैसा भव्य पुरातन जोगी ।। शरयूतीरों बैसला ।। १ ।। फेंकूनि दिल्ला बादली चीरा ।। वाटिला मोतियांचा तुरा || फेडुनि पिवळ्या पीतांबरा || वनीं वल्कले नेसला ॥ २ ॥ अतां होऊनि बेजार ।। काढी किनखापाची वीजार ।। जैसी जुनी तुटकी पैजार ।। तैसे राज्य झुगारिले ।। ३ ।। धाडुनि लक्ष्मणा सुभटा ।। चीक आणिला प्राथुनि वटा ।। मऊ केशाच्या केल्या जटा || दिव्य तांबड्या धगधगीत || ४ || उदास होऊनी सुवर्णनगी ।। सन्निध सीता बैसली उगी । भेटीस नलगे परवानगी ।। उघडे दर्शन चांगले ॥ ५ ॥ भरते समाते विनवीले । त्यासी पादुका भाग्य. दिल्हें ।। चौदा वर्षे राज्य भले । करितील आतां पादुका ॥ ६ ॥ मर्दुनि रावणा ३६. वपन-हजामत. ३७. अघमर्षण=पापनाश. Ja