पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुकचरित्र. सरळ सुपारी । गगन चुंबिती । द्राक्षफळाते पक्षि भक्षिती । लितीबराबर शीतळ नितळा । पाट वाहती । थाट दार प्रफुल्ल वृक्षी । फाट नसे परि वाटे मधिं । चोहाटे बांधिले । रत्न शिळा लखलखाट । त्यांच्या कळा फांकती। मधुर शब्द कोकिला गुंजती । सकळामध्ये । बकुळाच्या । समकुळाभोवते । अलीकुळाचे | बूंद हिंडती । मंद मारुतें । वृक्ष डुलती । नांगकळे परिमळे झुल्लती शूक शुकातें स्पष्ट बोलती । अरिष्ठ तुज हे आले ह्मणती । धारिष्टाते हलवू पहाती । मुख्य अघाती । श्रीरागाने । गीत गाती । ऐशी विवशी । तुज खायासी । लक्ष लाविले । सुदक्ष मुनि तो । अंक्षकपाटे । अक्षय लावुनि । क्षेम-रूपें लक्षित जेणे । शमदम हृदयीं भरिला । श्रीशुक० ॥ १० ॥ कुशासनी क्षेम कुशल समाधि सम भजनी रस चढे उन्माद न गणी । कांहीं हर्ष विषाद निर्गुण विवाद । भोगी अद्वय चिन्मय मुद्रा । सौख्य समुद्रा । मध्ये विषय क्षुद्रासि त्या । नातळोनियां । मन बुद्धाचे पैल तिरास । गांठुनि शक गिरास । भाग्याचा तो वैराग्याच्या । दैविर्ता । दुर्गाधिप ऑर्गा सम साजे । स्वर्गावरूनि स्त्रीवर्गांनीं । शुकोपसर्गा मोहोरवर्गात । घेउनि त्या वरि विध्वंसाया । ईर्षा पोटीं अति हर्षाने सुंदरशा त्या संगें घेउनि । बाळा प्रौढा मुग्धा नारी । सुरती निरता । चतुर चौकसा | चौयायशी असनी व्यसनी शहाण्या | सुंदर पाहाण्या । कोणी लाहाण्या । मोठ्या गोऱ्या गोमट्या । खोट्या मनिंच्या । कामिष्टा त्या । नेमिष्ठाचें । चेष्टाया मन । अचाट दळ । अबळांचे कैसे । प्रबळ माजलें । मांजपट्गने मौज बांधले । सैन्य साजले । नितंब तेचि मतंग त्यांवरि । ध्वजा फरारी तेवी अंचळ । वायू स्पर्श हलती चळचळ । पाहुनि त्याचे धीरत्व हि चळचळ कांपे । झळझळ भांग । शिरींचा सांग चि । हृदय ते दुभांग करिती । भांग जशी सर्वांग व्यापुनि गाढी मूर्छा पाडी भृकुटी-चापे । ताडी नर मृगनयन-बाण सत्राण विवेकें । प्राण हरती वैराग्याच्या ठाण्या वरुती । उठावणी हे | कठिण कुचांची । अग्रे ज्यांची निज भाले । तेंवि निघाले । केंदन कराया मदन शुभांगी । भैणंग शिवे तो अनंग केला । यदार्थ चरणावळी ९. अलि कुळदभ्रमरसमूह. १०. नाग-तर्प. ११. शमदम शम मनोजय आणि दम बायेंद्रियजय. १२. दुर्गावर्ता=किल्लयावर. १३. भर्ग=शिव. ११. मोहोरवर्गात= ? १५ बाळा प्रौढा=वाला स्यात् षोडशाद्वावधि तदुपरि तरुणी त्रिंशतो यावदूर्ध्वम् । प्रौदा स्यात्वंचांचाशदवधि परतो वृद्धतामेति नारी ॥ (रतिरहस्य). १६ मुग्धा अंकुरितयौवना मुग्धा. १७. पाहण्या-देखण्या, सुंदर. १८. माजपटा-कमरपटा. १९. माज-कमर (सं० मध्य), २०. नितंब-कुल्ल. २१. मतंग-हत्ती. २२. सांग एक प्रकारचे शस्त्र. २३. भांग-एक मादक पदार्य. २१. सत्राण जोर.. २५. करन युद्ध. २६. भणंग-भिकारी.