पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुकचरित्र. (१७१) नको नको म्हणतां गळां चि पडले । भुजे वेष्टुनियां ! तपा भ्रष्टवुनि । निष्टुन तुमच्या सभेस आल्य ते हे रंभा अंभोदीज्यं । जाणतसा परि मानितसा मज । द्या द्या वीडा दाविन क्रीडा । मोह-बेडा भी घालिन खोडा । शुक कीडा थोडा च वयाचा । धडा मनाचा । मोडुनि याचा । कडासनावरुनीया मग मी । सडा चि धड धड धांवत आणिन । ऐशो रंभा गोड बोलुनि हो? विडा उच! लुनि हस्तकिं मस्तकिं धरिला श्रीशुक ॥८॥ इंद्र ह्मणे गे चंद्र-वदने । चंद्रहार घे चंचलनयने । चित्रविचित्र हिं चिरें भूषणे | चंदन चर्चित सुगंधाने । हार चमेली चंपा-सुमनें । चतुरपणे वंचवीं युक्तिने । निश्चल मुनि-मन चंचळकरणें । मुखचंद्राने चंद्रि लावुनि । नयनचकोरें । करी भिकारे । बहु प्रकारे विकारवावे | चित्त तयाचें । तपोवित्त हळु जपूनि ध्यावे । सहस्रनयने गौरवोनियां । सौरभजननी । सहास्य वदने अवश्य यदली । वश्य करिन मी । नमन करुनियां गमन करितां । शचिपति लागुनि । रतिपति मागुनि । वसंत घेउनि । हास्यवदना । हृदय द्युतिने । विद्युत्तेन ते ललना जात्या । उचिता कृतिने विकृति पावे । विवेक वृत्ती । तैशा अनृती। तथापि तृप्ती । गान तान संगीत पयोधर । शीत तेय मंद सुगंध वात सह । सुरबर किन्नर गंधर्वादिक । सर्व चि वय गर्ने स्फुरती । अवघ्या कुशला सकाम कामिनि । सौदामिनिशी दिव्य शरीरी । भव्य भूषणे । भाकराच्या उग्र प्रभेचा भोळा जन मग लाभ लाभला । भला मनाला आला प्रेमा । बीळालिंगनि ताळा घालु. नि । भ्याला मग त्या परहाताला | पडेल घाला लोश माळा । गळां च घालिती । छळोनि घाला । समुदायें प्रमदा येकसला । सकळा ही विमान वहनीं । समान नक्षत्रांच्या पंक्ती । दिशा रंगती । निशा भंगती । अंग-प्रभेने । उजळे तन ते । सोज्वल वस्त्रे मजन करुनी । कज्जल किंचित चिरी लावुनी । दिसति हिरे पाचूचे हार । फार सुमनांचे ते भार मस्तकं वरिले । हस्तकि धरिले । सन्मुख सखया अर्पण करिती । दर्पण पाहुनि सिंधुजानना । मूख इंदु वरि तिलक-विदु सुरंग रेखिला । अंबुज मुखिनि मुनि-वृंद भेदिला । एक शूक मुनि । त्या हि द्विजवरे । भाळि बिजवरे । धिःकारिले अनुमंधाने । ध्यानयोग हा जुनाट चंदन । नंदन वनिंचा । आनंदाने अंग चर्चिले । हृदय पिंडिका ७.. अभोदीज्य=एथे कांहों अपपाठ असल्यामळे दुर्बोधतत्व आहेसे वाटते. ७१. होडविडा-पैजेचा विडा. ७२. चिरें वस्त्रे. ७३. समन-फुलें... वंचवीं ठकवी. ७५. सहस्रनयन इंद्र. ७६. सौरभजननो रंभा ? ७७. रतिपत्ति-मदन. ७८. सौदामिनो-वीज. ७९. प्रभाकर सूर्य. .. बाळा-स्त्रिया, ८१. लोश? ८२. येकसका एकदम ! ८३. मज्जन लान. ८. सिंधुजानना चद्रमुखी.