पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७०) अमृतरायकृत कृपेला । उन्मनिंचा तो मार्ग शोधिला । तत्वमसि महा-वाक्य बोधिला । कामक्रोध-समुदाय छेदिला । नित्य ब्रह्म निर्वाणे लाधला । स्वानंदामृत घटघट प्याला । आनंदाचा ढेकर दिधला । आत्मा सेवुनि स्वस्थ बैसला । संतोषाचा बाग लाविला । दुराविले त्या नष्ट अशेला । शाल दुशाला कशास त्याला । तोडुनि टाकी मोह पाशाला । काय नियम यम करिल अशाला । अशासि येथे कशासि अणिता । त्यासि मसाला करील कोणी । झणी कसाला । बोले कृतांत आत्म दुतांला | जिता चि मेला निकाम जाला । जिवन्मक्त शुक ह्मणती त्याला । बहु देणे मग नलगे ज्याला । असो बिचारात्याचि विचारा । येईल तैसे बरे म्हणावे । उगें पहावें । इंद्र स्वभावें येउनि प्रेरी । त्या रंभा-सुंदरिला ।। श्रीशुक० ।। ७ ।। - अनुष्ठान तप-कळा लोटल्या । तप तेजें दश दिशा दाटल्या । पुण्य नद्या शकाच्या अटल्या । सुकृत बळे जरि शूक भेटल्या । ऋणानुबंधैं गांठि तूटल्या । इंद्रमनी कल्पना ऊठल्या । तेव्हां त्याच्या शक्ति खुंटल्या । युक्ति खुंटल्या । वृत्ति वीटल्या । जैसे वान मैना साठी। मार्गस्थाच्या लागे पाठी । स्वभाव दाःखे होउनि कष्टी । तैसा तेणे देवेंद्राने । यत्न मांडिला । रत्न सुरवरी । सभेसि रंभा आणि मेनका । तिलोत्तमादिक स्वर्ग-गामिनी । पाचारुनियां इच्छित सांगे । लान वदने पुण्यामृत शुक्राचे हरुनी । दोहन करणे । मोहन रूपे । रंभा वहिनी चतुर शहाणी । अवनी-भुवनीं शुकॉच्या । परामृशाते । जावे म्हणुनी अति हर्षाने । शतयज्ञाची आज्ञा वंदुनि । करी प्रतिज्ञा । शक सभेसी वक्र पाहुनि । हंसोनि बोले देइन झोले। भले भले मी चेववीले । पंचविषये म्यां चेववीले । धाउनि आमुचे मुखरस प्याले । तपक्षयाते सवेचि भ्याले । आणिक घांवले वनी पावले । तपें तापले । नेत्र लाविले झाले गेलें बरें विसरले । तपोधनाने सधन हि जालें । आसन । तुमचे थरारिलें मग । अह्मा प्रेरिले । तेथे जाउनि । गाउनि नाचुनि । पुण्य-दुधाते । दोहानि घेउनि । मोहन-यंत्रे विश्वामित्रादिक सत्पात्रे । वात-अई अणि गळीत पत्रे । भक्षुनि तपती अमुची सूत्रे । वेग वक्त्रे । मुत्रे कुत्रे । जैसे तैसे पाठी लागुनियां क्षणमात्रे । त्याला मुंगी येउनि लुंगी ! सुटली स्मरगुंगी ते तेव्हां हुंगित हुंगित जवळ चि आले। ५६. उन्मनी= जागृती, स्वम, सुषुप्ति, तुरीया, व उन्मनी या पांच स्थितीतील शेवटची म्ह० पांचवी. ५७. तत्त्वमसि तें तूं आहेस. (टोप १३ पहा). ५८. ब्रह्मनिर्वाण= ब्रह्मसुख. ५:. दुशाला दुहेरी शाला. जोड शाल. ६०. नियम-शिक्षा. ६१. रुतांत-यम. ६२ वमन ओकलेला पदार्थ. ६३. म्लान-कोमेजलेलें.६१. शतयज्ञ इंद्र. ६५. पंचविपय-रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श.६६. अंबु पाणी. ६०. गळीतपत्रे गळलेली पानें.६८ लूगी-लहानगी. १९. स्मर:-मदन.