पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अमृतरायकृत काय बोलिला || श्रीशुक० ॥ ४॥ पुण्यलता हे फळासि आली । कृष्णे निभलि । अशि चालविली । पापशंखळा हे तुज कळली । तरि कां माता हे शिणवीली । निघोनि आतां सोड माउली । स्वरूप-सत्ता पाहे आपुली । मनासि वोधुनि वनासि जावें । ब्रह्म भावे ननासि ध्यावे । धनासि अणि स्त्री-जनासि भ्यावे । नातरि माया फिरविल वांया । भरविल या बा आडराने । रामावांचुनि निकाम राँमा । भुलविल तुजला । तुजला देइल टोला | चौयाशींचा दाविल झोला । कृष्ण बोलतां शक निष्ठला। भ्रष्टला या प्रपंच्यातुनि । गेला तैसा आला नाही । पडला ईंड-शत्रूच्या डाई । वासनेला मारुनि घाई । जाळुनि अंगी भस्म चचिले । नीवित जाण असे खर्चिलें । वाणि-द्वारा ब्रह्म चर्चिलें । जिवित अर्चिले । प्रबोध हृदयीं शिरकविला ।। श्रीशुक० ॥ ५॥ हृदयों धरीत करि पन्छव ग्रंथी । प्रेम भरित हृद-विवेक पंक्ति । छेदित ऐसे जेणे न घडे । जन्म सांकडे । द्वयारोकडे । प्रसूत भूत | नूतन सरिता । संकोच रस्ता । विस्तारें श्रम लिहितां दस्ता | कागद नपुरे । पुरे पुरे हे आस्ता । ऐशी शास्ता घडली । धास्ता खाउनि । द्वययन-सुत पैय-पानाले । अव्हेरुनियां घोर वनाते । न घडे जन्म तो तत्क्षणांतें । दर्शित ज्याची । ज्ञान-दशा जग मृषाचि भासे । मूंगदृशा भ्रमवि अशा तेव्हां । व्यास मनी हव्यास उठीला । श्वास सांडिला । अशा अशा बाळासि पाहावे | कास घालुनि पृष्टिं धांवला । वियोग दुःखें ओष्ठ सूकला । शुक शुक ऐशी हाक मारुनी । शुक डोळीयां मुख दाखवी । अरे पुत्र क्षणमात्र उभा रे । मोह कळवळे येति उबारे । नेत्री चळ चळ अश्रूधारा । स्मश्रु-अधरा वरोनि ढळतां । आकळितां नाकळे चि ममता । चक्षू पुसतां पक्षि शुकाचा । वृक्ष आणि तृण पक्षि बोलति | "ॐ शद्वे जो प्रणव महा-वाक्याचा ध्याता । ध्याताध्यात ध्यान धारणा । जन वन ज्ञानामतदृष्टिने । सष्टि सिंचुनी शीतळ केली । निवांत जाली | हे तात! तात! चित्तांत । आप विख्यात मात हे सर्वांतरी हे । निरंतर असतां । अंतर मानुनि । अभ्यंतर कां जाळुनि घेशी । आलो ना मी गेलो कोठे । जन्मलोना मेलो नसतां । भ्रांत दुःख विश्रांत होउनी । शांतपणे सिद्धांत विवरुनि । असें पहावें । आवरणशक्ती । पंच महा-भूतांची व्यक्ती । उभी ठाकतां । बंध मुक्तिचा । शब्द रूढला । ३५. रामा स्त्रो. ३६. षट् शत्रु काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. ३७. डाईद्वेषांत. ३८. द्वैपायनसुत-व्यासपुत्र शुक. ३९. पयपान दूधपिणे. १०. मृषा खोटें. ४१. मृगदृशा स्त्री. १२. स्मश्रु-दाढी. १३. प्रणव ओंकार. १४. महावाक्य="तत्त्वमसि" म० तें (ब्रह्म) तूं आहेस हे वाक्य. १५. पंचमहाभूते पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश