पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुकचरित्र. भजना वांचुनि श्रीहरि । जन्मोजन्मों काळ क्रमिला ।। || श्रीशुक० ३॥ भय पापाचे कां न धरी । पुराण-कीर्तन-देवद्वारीं । तांबुलभक्षण कुष्ट शरीरौं । कम वमै निंदा करी । टिटवीजन्म त्या पक्ष्यां भितरी । गुरु शिष्याशी विद्या चोरी । होय पिगैळा तो निर्धारीं । अनुचित प्रतिग्रैह ब्राह्मण घेतां । गंडमाळा होती अद्भुता। परद्रव्याचा अपहार करितां । पर क्षेत्रिच्या गाई वलितां । अल्प-आयुषी होय तत्वतां । सत्पुरुष अणि प्रजा पीडितां । व्याघ्र सर्प होय तत्वतां । साधु-छळणी वंश-क्षयता । देवद्वारीचे तरू तोडितां । छाया मोडितां । पांगुळ होती जाण तत्वतां । जारकर्मि ते वेश्या जाण । स्त्री-पुरुषांचे गुह्य श्रवणे । दासी किंवा कुंटिण होणे । सेवकासि नो त्रासी पूर्ण । तोचि मोळ्यावाहक जाण । सेवक होउनि स्वामि जाचणे । इवान होउनि बहू हिंडणे । ब्रह्म-राक्षस बहु अभिमाने । देवालयाचे तेल चोरणे । मार्जार होउनि गुर्गुरकरणे । त्रास माता-पितया देती । मर्कट होउनि वृक्षी फिरती । क्षेत्री म्हणवुनि युद्धी पळती । सिमा लोटिती । कवन निंदिती सत्पुरुषाचे । वृश्चिक-रिसौदि जन्म पावती । वेद-शास्त्र ने उगें निंदिती । द्वेष करिती महा पुरुषांचे । तस्कर होउनि नाश तपाचे | बंधू-बंधू वैर करीती। मत्स्य होउनी जळी विचरती । दोघी स्त्रीया जे कां करिती । येकीचे जे चित्त राखिती । सरिमेयाच्या शिरावर्ती। गोचड होउनि तरतरताती । उदक कोडितां मूत्रकोंडतो । पृथ्विपतीची निंदा करितो । उदरी अग्नी मंद होतो । ग्रहण-संधी करितां भोजन । पित्तरोग त्यां होय दारुण । पर-बाळा दुरदेशी विकणें । वचनों गुंतुनि पालट करणे । गलित-कुष्ट-दुर्गधि साहणें । अपराधाविण स्त्रीस जाचणे । एक अंग ते जाय तयानें । ब्राह्मणाचे अन्न हरणें । वंश शून्य हे शास्त्रि पहाणे । गुरु संत आणि माता पीता । त्यां उपहासितां । वाचा जाउनि होय दुःखिता | ब्रह्म-वृंदा त्रास चि देतां । व्याधी तिडका लागती कुंथा । पुराण-अवर्णी हरी-कीर्तनी । जाउनि निजतां अजगर जाला । अतिवादे तो सन्निपातला । देव पुजेने वीट आला । मारि नाहकाला । पुस्तक चोरुनि मुका चि जाला । नमन करीना जो संताला । कठोर बचनें त्रास दोधला । बहु जन्माचा । बहु जोनार । त्रास पावलों वारंवार । नुलंघवे मायापूर । अशि वाक्ये ही शुक मूवींची । ऐकुनि साची । श्रवण करी जगदात्मा ज्याची। धरी चित्ति मुक्ति त्या फुकाची। अनुभवाची । जन्मांतरिची । ऐकतां चि तेधवां श्रीहरिहरासि स्मरुनि २७. पक्ष्याभितरों पांखरांत. २८. पिंगळा-पक्षिविशेष. २९. प्रतियह दानघेणे. ३०. क्षेत्र-शेत. ३१. वृश्चिक-विंच. ३२. रिस-आस्वल (संस्कृ० ऋक्ष). ३३. तस्कर-चोर ३४. सारमेय=कुत्रं.