पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अमृतरायकृत ऐका अपूर्व कथनें । स्वधर्म सांडुनि अधर्म वाटे । कुकर्म जीवा गोड वाटे । अनर्थ तेथे कर्मचपेटे । मर्म तयाचे कर्म फळे मग । कृमी होऊनि भ्रमणी चक्रीं । भ्रम दुखाने काळ की मी । मी मी म्हणतां मेंढा नालों | चंडी पाशी मांड खटलो | काळचक्रामानि भरडलों । बुरूड होउनि दुरड्या केल्या । कोष्टी होउनि पाष्टा विणिल्या । परस्त्रियेते पहातां दृष्टी । अंध होय त्या पापे कष्टी । विषय-प्रयोगे अंग कुष्टी । अन्न-दाने स्वदेहपुष्टी । द्रव्य-दाने नित्य तुष्टी । अदत्त-योगे पात्रे उष्टीं । चाटी इवान होउनि 'ईष्टी । भिक्षा तांदूळ न घालि मुष्टी । तरी च कीटक कोरड काष्टीं । हरि-नामाची न करी गोष्टी । दर्दुर होउनि ओरडे सृष्टी । ब्रह्म-कुळींचा आचार भ्रष्टी । तरीच गर्दभ भार पृष्ठी । अतिथी उपवाशी ठेवुनि आपुल्या काया पोशी । धनी असोनी विपत्ति सोशी । पुरून ठेवणे ऐसा दोषी । घुशी होउनि घुसे बिळांत चि । विडील काळा मुषक म्हणे मी। संकर नामा डुकर होउनि । उकिर उकरडा उकरला । श्री शुक० ॥ २॥ सुंदर काया तीर्थ स्नाने । पोट शूळ हा भूतद्रोहाने । गनादि वहने कृपाद्रवाने । दुष्ट जन्म घे उपद्रवाने । परद्रव्याचे करितां हरणे । दरिद्रतापें तापनि मरणे । रक्तपिती चोरितां चि सोने । क्षय-रोगी हा वृत्ति-क्षयाने । अनेक दुःखे अनृत भाषणे | व्याघ्रादिक हे गळा बंधने । अस्वल होती रीण गिळोन । नेत्र झांकुनि जुपिति घाणीं । वनीं वाघुळा अधोवदनी | पंक्ति-भेद जिहिं केला त्यांनी । धर्म करी त्या मोडा केला । गर्भ-खोडा प्राप्त जाला । प्रसूति समयी अडवा आला | शस्त्रे छेदुनि लुवा केला । लक्ष चौऱ्याशी हा बाजार । करी बेजार । बहू जोजार | हजार वर्षे कारागार । देह सर्पाचे | काक-बैंकाचे । गृध्र घुकाचे । स्थावराचे । फिरत फिरत मग ईशदयेनें । कर्मभुमी नरदेही येथे । स्मरणी लागी मे जैसा शतायूष ते अमोल्य योडें । जन्मलों मी गी स्मरतां । सोहं सोहं बाहेर पडतां । विसरे हे मी । देहे गेहें । माया मोहे | मामा-मामी । काका-काकी । ताई-माई | आई-बहिणी । विहिणि-मेहुणी । इत्यादिक हे कर्म-कहाणी। या नात्याच्या गुंडाळ्याने । गुंडाळुनि बंडाळ चि झालो । चांडाळ चि मी । मोहें याचा । आचावाचा नर-स्तूतीचा | काम वस्तूचा आर्जवाचा | हरीहराच्या १३ चंडी देवी. ११ दुरड्या-पाट्या. १५ पाष्टा=सताच्या गुंड्या. १६ इष्टी यज्ञ. १७ दर्दर बेडूक. १८ बिडाल मांजर. १९ सूकर-डुकर. २० जेथे अक्षर दोर्घ असून न्हस्व वाचले पाहिजे तेथे त्या दीर्घ अक्षरावर ७ अशी अर्ध चंद्रकार ग्वण केली आहे व जेथें अक्षर हस्व असून दीर्घ वाचले पाहिजे तेथे त्या व्हस्व अक्षरावर – अशी कुंकवाच्या चिरीसारखी खण केली आहे. २१ वृत्ति उपजीविकासाधन. २२ लुडवा हस्तपाद रहित. २३ वक वगळा. २४ घक-घुवड. २५ स्मरणी=मण्यांची माळ. २६ मेरू माळेच्या मध्य भागचा मोठा मणौ.