पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अमृतरायकृत शुक-चरित्र. गभी असतां ज्ञान जहाले । श्री शुकाने जिवि ते धरिले । जन्म-जरामय-मरण वारिलें । भव-भयाते संहारीले । तप-सामर्थ्य ताप हारिले । विवेक-मंत्रे मन आंवरिलें । विषय-पसारे दूर सारिले । असे वेदांतीचे वरिले । अशेष जेजे भोग भोगिले । शुक-अर्भका-गर्भ-जाचणी । द्वादश वर्षे । अति-प्रकर्षे । अवयव उदरी आकर्षुनियां । निकर्ष करुनी वर्षे बारा । गर्भदरीचा अती उबारा । क्षुधा नळाचा ताप दुबारा । अधोवदनीं क्लेशा-सदनी । नार-बंधनी । मूत्र-आधणी । दायर इष्टा पिष्टफळा सम । उकडत होता जठराग्नीनें । त्वचा हि कोमळ | नाकी तोडी जंतू बुळबुळ । वळवळताती । तळतळ होतां । कळकळ निवास | फ्यपंकी कारागृहवास । कुश्चळ दुगधीचा त्रास | सर्व रोधिले श्वासोच्छास । सोहं सोहं हा निजध्यास । वैराग्याचा जिवि हव्यास | बाहेर पडता मी अभ्यास | करीन साधन बहु सायास | ताप हि साहिन शीत ही न । क्षुधेशि खाइन । मनासि घेउन वनासि जाइन । तृषेसि लाविन आले वाटे । हरि-नामाचे घेइन पेटे | उतरुनि भव-नाद जाइन वाटे । फोडिन कर्माची हि कपाट | सांडिन वासनेचे फांटें । उपडिन अभिमानाची बेटें । उत्पाटिन मी मोक्ष-कपाटें । ऐसा गभी ध्यास लागला | मातेचा जिव बहू भागला । व्यास म्हणे इस रोग ला. गला । उन औषधी रेच योजिला । मंत्र-प्रयोगें जाळिन याला । समंध ऐसा कोण जन्मला | ऐसे नाणवि श्रीकृष्णाला | श्रीहरि बोले त्या गर्भाला । शुकापरी पढवीता जाला । म्हणवुनि शुक हे नाम तयाला । कमें कथिता नाला श्री हरिला | श्री शुक-योगोंद्राने रंभेचा गर्व हरिला । धृ ॥ १॥ पुससी कोण तो मी ऐसा । अनादि निव तो नामें कैसा । पाप पुण्य मिश्रीत सरीसा । अंगुष्ठा सम-लहान उलीसा | तो मी सूक्ष्म स्थळी भरलो । लक्ष चौयाशी भरूनि-पणे । दुनि जाले येथे येणे । दडी दीधली पाप-भयाने । माझी १ जरामय जरा + आमय-म्हातारपण व रोग. २ भव संसार. ३ वेदांत वेदग्रंथांतील शेवटचे ग्रंथ म्हणजे उपनिषदें. १ अर्भक-मूल. ५ क्षुधानळ-भूक हाच अग्नि. ६ जार-गर्भाच्या सभोंवती असणारे वेष्टण ( वार ). तीन प्रकारच्या जीवकोटी आहेत:-जारज, अंडज, उद्भिज. ७ दाथर-मोदक उकडते वेळी गवताचा थर भांड्यांन घालतात तो. ८ पूयपंक पू हाच चिखल. ९ पेटे नदीतून तरण्याकरितां भोपळे इत्यादि साधन घेतात तें. १० कपाटदार. ११ शुकापरी पोपटासारखा. १२ पेणे मार्ग चालतांना विश्रांतीकरितां केलेला मुक्काम.