पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१६४) पांडुरंगकृत नारायणराव पेशवे यांचे चरित्र. या जगन्निवास ।। सोमवारचे दिवसास ॥ अनंत चतुर्दशीस || वास केला स्वर्गीचा ॥ २०२ ।। नहाले ऐका वर्तमान || आले रायासी विमान || राया बरोबर दिल्हे प्राण || ते ही गेले बसून ।। २०३ ॥ केला रायाचा घात ॥ त्याचा होईल निःपात || बेचाळीस सहीत ।। नरकांत पूर्वज पडतील || २०४ ।। विश्वास राव बापूवर प्रमाण || कैसा केला अभिमान || कळलें होतें वर्तमान ।। नाहीं रायास कळविले ॥ २०५ ।। मोठ मोठाले आंत ॥ ने कां होते फितुरांत ।। त्यांचा होईल निःपात || आणि होईल नाचणी ।। २०६ ।। नाहीं पापासी अंत पार ॥ नये नर जन्म वारंवार ।। याजकरितां सारासार ॥ विचार नाही पाहिला ॥२०७॥ असे दुष्ट हे साचार ।। त्यांचा न करावा उच्चार || जाहला पृथ्वी वरता भार || त्या हो कां दुष्टांचा ।। २०८ ॥ राय गेले स्वर्गास ।। काळजी लागली सर्वांस ।। देवाचे नाही चित्तास । कसे आले म्हणती हो । २०९ ॥ त्याचे स्वरूप सगुण ।। गहीवर येतो आठवून || नाहले वाईट म्हणन || कष्टी होती लोक ते ।। २१० ।। जसे सिंहाचे घर ।। जाऊन नंबुक भितर । ईश्वर मायेचे कौतुक ॥ कोणाला ही न कळे ।। २११॥ केला राज्याचा कळस || केला दादांनी आळस ।। नाहा पाहिले पापाचे भयास ।। अनुचित केले ते ॥ २१२ ॥ आपुले नासिक कापून ।। कल वेन्यासी अपशकून ॥ आपली कामधेन विकन । लोका घरी ताक मागे ।। २९३ । देखोन पुरुष सुंदर ।। आवडे चित्ता बरोबर ।। म्हणोनिया भ्रतार ।। त्यागून नाहली असती ।। २१४ ।। चिंतन होई चिंतामणी || तोही घालन गोफणी ।। दिल्हा तो हा झोकनी ।। म्हणे गेला किती लांब ।। २१५ ॥ राज्य आणि श्री सुख ॥ नाही कधी भोगिले द:ख || आणि परमार्थ वर्तणक ॥ स्नान संध्या केली ती ।। २१६ ॥ देव-पजा नाहीं शरीरा || भोगनियां राज्य करा ॥ वया योग्य नैसा बरा ।। गंगेचा ओघ तो ॥ २१७ || फार जाणे फार वि. चार || बुद्धिवान धार्मिक विचार ।। याजकरितां वारंवार ।। कीर्ति रायाची वर्णिली ॥ २१८ ।। कुफराणे दुष्ट नाण || काय त्यांचे व्यर्थ जिणे ।। कलियुगीचे महिमान || आली सृष्टि उफराठी ॥ २१९ । जे करिती दानधर्म ।। त्यांचे पाठीमागे कर्म ।। जे करिती स्वधर्म ।। अधर्म चाले तेथींचा ।। २२० ॥ कलियुगी गुण || होईल विस्तार म्हणून ।। किती वर्णावे अवगुण ॥ थोडक्यांत आटोपिलें ।। २२१ ॥ नारायण रायाचे चरित्र ।। तुम्ही ऐकावे पवित्र ।। तेणेंकरून होईल मित्र ।। देव तुम्हा लागी तो ।। २२२ ॥ आपले दिसू न देई अंग ।। कौतुक करितो श्रीरंग ।। कविता करितो पांडुरंग ।। वर्णी चरित्र रायाचें ॥ २१३ ।। SEANI