पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नारायणराव पेशवे यांचे चरित्र. (१६३) कीर्ति केली नगों ही ।। १७९ ।। क्षण न लागतां गारद्यांस ।। मी एकटा पुरेन त्यांस ।। तुम्ही केला हा नाश ।। कर्म केले अघटीत ।। १८० ।। बरे नाहले अझून काय || गारदी म्हणजे पदार्य काय ।। असे बोलतां भवानराय ।। गारदी भ्याले बापुडे ।। १८१ ॥ समस्ताशी हालोहाल || जाहला रायाचा तो काळ ।। आनंदीबाई राया जवळ ।। जाऊन ती का बैसली ।। १८२ ।। कपट असे चित्तांत ।। म्हणे केला मलाचा घात ।। दांभिक भक्ति जनांत ।। दावी राक्षसीण ते ॥ १८३ ।। चरित्र हे स्त्रियांचे जाण ।। नकळे पोटांतील कमे ।। दादांना ही शिकवून ।। घात केला रायाचा ॥ १८४ ।। पार्वती बाईस दुःख फार ।। रुदन करी अनिवार || मारिला बाळ सकमार || नाही करुणा आली ती ।। १८५ ।। कर्म केलें करूनि भेद || नाही चित्ता मध्ये खेद ।। करी माझा शिरच्छेद ।। दादाने म्हणे बुडविले ॥ १८६ ।। आपले आपटोनी मस्तक । म्हणे कुळाचा दीपक ।। पेशव्यांचे वंशी एक ।। होता तो कां मारिला ।।१८७||. याचा पुसिला हो ठाय ।। लेकरूं अज्ञान राय ।। त्यासी वधोनि पुढे काय ।। मोक्ष पद जाहले ।। १८८ ।। तमचे हाती देऊनि रायास ।। माधवराव गेले कैलासास || नाही होऊ दिले नव मास || तेही लाविले ठिकाणी ।। १८९।। जाहले दुःख द्विगुण ।। आठवून रायाचे गुण || आपले हाते हृदय आपटून ।। शराराच कस ताडिले ।। १५० ।। सगणा बाई आकांतून || कळवळा आला पोटांतून ।। गेले राव दुजे ठेवन ।। पाहं आतां कोठे मी ।। २९१ ।। फुटला सर्वांशी गहीवर ।। गहजब गंगा बाईवर ॥ कैसा रुक्मिणीचा वर ॥ देव तो कां क्षोभला ।। १९२ ।। निष्ठूर जाहग सीताकांत ।। कैसा करविला आकांत ॥ पाडिले राव एकांत ।। दादाच्या त्या महालांत ।। १९३ || रात्र झाली एक प्रहर || तेव्हां मिळाले समग्र ।। पण्यासारखें नगर ।। आज रायाने त्यागिले ।। १९४ ।। साहित्य करावयासी ।। सांगितले त्रिंबकराव मामासी । फुटले जे त्या आकाशासा ।। लावितां नये ठिगळ ॥ १९५ ॥ जाहला निश्चय गंगाबाईचा ॥ बरोबर जावयाचा ।। मोडिला ध्यास सतीचा || अवघ्या बायांनी मिळोन ॥१९६।। परंतु म्हणे मी न राहें ॥ आनंदी बाईने केले काय ।। लोटून खोलीत लवलाहें ।। बाहेरून कडी घातली ।। १९७ ॥ मग उपाय चालेना ।। न ये देवासी करुणा ।। ऋणानुबध हो नाणा || दोघांचा तितका च ॥ १९८ ।। आकांत केला को. मळ ।। पडला मोठा तो घोळ ॥ हृदय नाहले जळून कोळ ।। अहो सुटला गहिवर ।। १९९ ॥ रात्र दोन प्रहरास || राव नेले नदी-तीरास ॥ अग्नि देऊन त्यास ।। कर्म केले यथाविधि || २०० ॥ विनय संवत्सराचे नांव ॥ शके सोळाशे पंचाण्णव ।। भाद्रपदाचे वैभव ॥ शुक्ल पक्ष होता तो ।। २०१ ।। तो