पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१६२) पांडुरगकृत विता हालोहाल || पळतां लोकांचे हाल || पुण्याचे जे कां कोतवाल || धोंडोपंत आले ते ।। १५७ ।। न चाले कोणाचा उपाय || अवघे करिती हाय हाय || लोक म्हणती पुसावे काय || त्या हो गारद्यांला ॥ १५८ ।। एक म्हणती करा हल्लयास ।। दुजे यर्जिती त्यांस || खवळितां त्या गारद्यांस ।। वाड्यांत करिती आकांत ।। १५९ ॥ गारदी जात उन्मत्त ।। न चाले कोणाचे मत ।। बापूचे हे मत ।। हल्ला करूं नये तो ।। १६० ।। तुम्ही त्याला मारूं जाल ।। वाडयांत करितील कल्होळ || काढा दुसरा निकाल ।। त्या का हल्ल्ग वेगळा ॥ १६१ ।। ऐकून बापूंचे वचनास ।। मानले सर्वांचे चित्तास । नाहीं केला सायास ।। त्या हो मग हल्ल्याचा ॥ १६२ ।। मनसबे नानापरी || करिती आपले घराघरा ॥ मग इतक्या उपरी || चोपदार आला वाडयांतून ।। १६३ ॥ मत्सदी आणि सरदार || असे मिळोन अपार || आला तेथें चोपदार ।। म्हणे दादाने पाठविल ।। १६४ ।। पाठविले कोणत्या कामास || अवघे पुसती हो त्यास || बनाबा मालोनी या दोघांस || बोलावं आलो मी ॥ १६५ ॥ मग हो त्या दोघां नणांस || चोपदार घेऊन गेला त्यांस || नाही येऊ दिले माणसास ।। बाहेर ते की ठेविले ॥ १६६ ।। नाहीं बरोबर खिसमतगार ।। नव्हती एक ही तरवार ।। मग दादांस नमस्कार ।। केला बजाबाने तो ।। १६७ ॥ मालोजीने रामराम ।। केला दादासी आराम ॥ जाहले रायाचे वर्तमान || सर्व त्याणे सांगितले ॥१६८।। तो ऐकतां च वृत्तांत ।। तो च खोचले मनांत ।। तम्ही कीर्ति हे लोकांत ।। बरी कली चांगली ।। १६९ ।। गेली गोष्ट नाही येत ।। असे दादा बोलत ।। करा पुण्याचा बंदोबस्त ।। द्वाही फिरवून आमची ॥१७० ।। आज्ञा शिरी बंदोन ।। आले बाहेर निघोन ।। अवघ्यांस येऊन || खबर सर्व सांगितली ॥ १७१ ।। जा. हले नाहीं बरे आतां ।। अवघे चकले चित्तांत ।। म्हणती दादाने पुरता ।। ता की दावा साधिला ॥ १७२ ।। गारदी निष्ठर हो जाण ॥ घेतला रायाचा तो प्राण ।। चापाजी तो निदान || जाहला रायाचा सोबती ।। १७३ ।। केली वाड्यामध्ये धम ॥ कितीकांचे केले काम || हजर पागे इच्छाराम || आणखी नाराजी नाईक ।। १७४ ॥ आणखी तोडिले वाडयांत ॥ नाहीं नाऊन पाहिले आंत ।। ऐसा ऐकून वृत्तांत ।। शक्ति गेल्या अवघ्यांच्या ॥ १७५ ।। केले दादाने अघ. टीत ।। आतां नाही बरी गत ॥ केलें कर्म अनचीत ।। त्या कां गारद्यांनी ।। १७६ ॥ आला कठीण वक्त ।। सरदार मत्सदी समस्त ।। गेली अवघ्यांची शक्त ।। गेले आपले घरोघरी ।। १७७ ।। प्रतिनिधि भवान रायास || बोलावन नेले हो त्यास || त्याणे जाऊन दादांस ।। उत्तर केले चांगले ।। १७८ ।। तुम्ही साधनियां परमार्थ ।। राजपदाचा केला स्वार्थ ॥ मोठा केला पुरुषार्य ।।