पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नारायणराव पेशवे यांचे चरित्र. (१६१) वाड्यापाशी येऊन ।। पुढे सरसावती ते ॥ १३४ ।। मोठे मोठे उमराव ।। तुम्ही ऐका त्यांची नावे ।। पाटणकर आप्पाजीराव ।। जो कां मोठा रणशूर ।। १३५ ।। बरंगे खंडोजी जगताप ।। त्याला देखतां सुटे कांप ।। पराक्रमी त्याचा प्रताप ।। वीर ते कां मिळाले ।। १३६ ।। रास्ते यांचा समुदाय || गणपतराव आनंदराव ।। दुसरे मामा त्रींबकराव ।। ज्याची दहशत कर्नाटकीं ॥ १३७ ॥ आप्पाजी बळवंतराव || गायकवाड गोविंदराव ।। प्रतिनिधि भवानराव ।। ताबडतोब आले ते ।। १३८ ।। मालोजी घोरपडे सत्वर ॥ आले ऐकतांच खबर ।। मालोजी राजे निंबाळकर ।। आणखी पागा हुजूरती ॥ १३९ ॥ खंडेराव दरेकर ॥ गेले होते भोसल्यावर ।। बाळाजीपंताकडे अगोदर ।। आधी गेले होते ते ।। १४० ।। आले बापू हे दिवाण || ऐका त्यांचे वर्तमान ।। बजाबा पुरंदरे नाण || आले होते घांवून ।। १४१ । विसाजी कृष्ण सरदार ।। हिंदुस्थानचा विचार ।। नांव राहिले हजारांवर ।। इतके शहाणे आणिले ।। १४२ ॥ असे मिळून अपार ।। तोफखान्याचे सरदार ।। भीवराव पानसेकर ॥ आणखी आले कृष्णराव ।। १४३ ।। दामले बाळाजीपंत जाण ।। गारद्यांचे आख्यान ॥ हे कळतां च वर्तमान ।। गेली शुद्धि त्यांची ती ॥ १४४ ॥ असे सांगू मी कोठवर || बाळानीपंत दादा ठोसर || आनंदराव बळवंतराव ।। सविस्तर जिवाजी लौकर आले ते ॥ १४५ ॥ राघोजी आंग्रे कुलाब्याहून ॥ आले बोलाविले म्हणून ।। तेही तयार होऊन ।। आले होते लवकर ।। १४६ मोरोबा दादा फडणीस ।। आले हो कां चिटणीस || किती धरावे गणतीस || होईल तो कां विस्तार ।। १४७ ।। सर्व मुत्सदी आणि सरदार ।। असे मिळोन अपार ।। मिळोन करिती विचार ।। एका जागी बसोन ।। ११८ ॥ खेद करिती चित्तांत ।। राव गुंतले माहालांत ।। हत्ती घोडे बधवारांत || दाटी जाहली मोठी ती ॥ १४९ ।। नाहला वाड्यांत कहर || बाहेर नये कोणासी खबर ।। बुधवारचे चावडीवर || सखाराम बापू वैसले ।। १५० ।। मोठे मोठे सरदार ।। मिळोन करिती विचार ।। करा एकदां च मार ।। गारदी देऊ उडवून ।। १५१ ।। गुंतले वाड्यांत राव ।। करितां नये उपाय ।। आम्हा पुढे गारदी काय || करिती ही बापुडौं । १५२ ॥ नाना फडणीस हरिपंतास || काळजी दोघांचे चित्तास ।। मोरोबादादा त्या समयास ।। बसून करिती खलबत ।। १५३ ।। बाळाजीपंत होदावर ।। बसून आणविती खबर ।। गारदी यांच्या बरोबर ।। कांही नव्हते राहिले ।। १५४ ॥ मिळोन सरदार अटोकाट ।। बुधवारांत एक ची थाट ।। नाहीं माणसांसी वाट । तेथे ती कां नावया ।। १५५ ।। दाटी पाहून बुधवारांत ।। हूल पडली शहरांत ।। जिकडे तिकडे शहरांत || गडबड मोठी जाहली ती ।। १५६ ॥ दुकाने ला.