पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१६०) पांडुरंगकृत डिला ।। १११ ॥ मग न धरी कोणी धीर ।। पडला रायावरता मार ॥ हाणले यारावर ते वार || त्या हो खरगसिंगाने ॥ ११२ ।। पृथ्वी समुद्र वलयांकित ।। ज्याचे असोन अंकित ।। नाहीं मारावयाची क्षीत ||हा धर्म कलियुगींचा ।।११३॥ मारून नारायण रायास || कैसा घातला हा फांस ।। हा हो त्याणे केला नाश ।। कैसा केला कुलक्षय तो ॥११४।। माता कापी बाळकास || कोण रक्षील हो त्यास ।। तैसी गती रायास || तेव्हां केली दादाने ।। ११५ ।। युद्धाठायीं अभिमन्यूस ।। करून वेगळे पांडवास ।। चक्रविभूमध्ये त्यास || कपटें करोन मारिले ।। ११६ ॥ तैसे केले यथार्थ ।। तेथे न चाले पुरुषार्थ ।। केला दादानी हा स्वार्थ ।। त्या कां राजपदाचा ॥ ११७ ॥ बाळ सकुमार केवळ || नव्हती जागा निर्मळ || राव मोरीच्या जवळ || पडले होते तेव्हां ते ॥ ११८ ॥ करून रायाचे काम ।। असे पाहिले आराम ।। करून दादास सलाम ।। सदरे वरते आणिले ।। ११९ ॥ लूट गारदी यांनी केली फार ।। नाहीं सोवळ्याचा विचार ।। कशाचा ही नाही सुमार ।। जोड्यासहित फिरले ते ॥ १२० ।। गारदी यांणी अकस्मात ॥ तांब्ये सोवळे धोत्र पात्र ।। नाही ठेविले तिळमात्र । नेले. त्यांनी सर्व ही ।। १२१ ।। केले गारद्यांनी वेडेचार ।। त्यांचा न वर्णवे विस्तार ॥ नाही ठेविला आचार ।। केली त्यांणी शिवाशिव ।। १२२ ।। सर्व जागा विटाळून ।। लुटालुटी हो करून ।। नाही पाहिले विचारून ।। हौदामध्ये थंकले ॥ १२३ ॥ आतां मी वर्ण कोठवर ।। दादा होते सदरेवर ।। सुमेरसिंग जमादार || आणखी होते गारदी ।। १२४ ॥ नाही मनामध्ये खेद ॥ वाजविती नौबद ।। करिती गारदी आनंद ।। दाही फिरखून दादांची ।। १२५॥ कळली बातमी तहकीक ।। जासूद नारोजी नाईक ।। येऊन दादाशी ठीक ।। त्याणे केला जाबसाल ।। १२६ ।। काय कार्ति हे लोकांत ।। केला कळाचा घात ॥ टाकिला गारद्यांनी हात ।। इशारत हातां ती॥ १२७ ॥ नाहीं गारद्यांला धीर ।। उडविले नारोजीचे शीर ।। नाहीं लागला उशीर ॥ गेला त्याचा प्राण तो॥ १२८ ।। नाहली वाड्यामध्ये धूम ।। बाहेर केली सामसुम ।। एकाएकीच धम ।। लोक पळू लागले || १२९॥ विचारती एकमेकास || नाही कळले कोणास ।। वाड्यापाशी आसपास ।। माणस तथे ठरेना ।। १३० ।। गारदी मोठे अनिवार ।। करिती बंदकीचे बार ।। होऊन घाड्यावर ते स्वार ।। हरिपंत आले ते ॥ १३१ ॥ गारदी बोलती निष्टूर ।। हरिपंत नाले चकित चतुर ॥ समजला वाड्यांतील मजकूर ।। तेव्हां मनी खोचले ।।१३२॥ केला सभोवती बंदोबस्त ।। बोलाविले समस्त ।। नाहीं चित्त स्वस्थ । उपाय न चाले म्हणूनी ।। १३३ ।। बातमी पोहचतां नाऊन ।। माले सरदार धांऊन ।। १. समुद्रवलयांकित समुद्र हेंच वलय म्हणजे कडे त्याने वेष्टित. ५. अंकित स्वाधीन.