पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नारायणराव पेशवे यांचे चरित्र. (१५९) अंगावरती दुपेटा । गारद्यांनी वाटा । धरल्या त्या चहुंकडे ।।८।। जिकडे तिकडे होते स्वस्थ । कांही नव्हता बंदोबस्त । खरगसिंगाने समस्त । कवाडे ती कां लाविली ।। ८९ ।। नावे म्हणे कोठे राव । नाहीं दुसरा उपाय । आतां दादा शिवाय । आश्रा नाही कोणाचा ।। ९० ॥ पुरते चित्ती विचारून । बरोबर शिष्या घेऊन । मग देवघरांतून । दादाकडे निघाले ते ।। ९१ ।। करिती गारदी बेफंद । जिकडे तिकडे कवाडे बंद । कैसें साधिले हे ईद । त्या हो खरगसिंगाने ।। ९२ ।। मग एक्या दारांतून । तेथे कवाडे मोडून । बरोबर शिष्या घेऊन । आले माडी वरते ते ॥ ९३ ।। लागला दादाचा निजध्यास । चुकावून गारद्यांस । लक्ष्मणभट्ट उपाध्यास | घेऊन ते कां चालिले || ९४ ॥ गारद्यांनी दाणादाण । मारामारी हाणाहाण । राव कोठीच्या जिन्याने। दादाकडे चालिले ।। ९५ ।। नाऊन दादांचे महालांत । धरिला रायाने हात । गारद्यांनी वाड्यांत । मोठा आकांत मांडिला ।। ९६ ।। तुम्ही केला हा फितूर । गारदी मारती निष्ठुर । याजकरितां जरूर ॥ तुम्हापाशी आलों की ।। ९७ ॥ राव बोलवी दादास ।। दादा उठले शोध करावयास । ही बातमी गारद्यांस ।। मागो माग आली ती ।। ९८ ॥ मारामारी करीत ।। जवळ आले त्वरित ॥ जैसा वाघ गरगरत ।। ती हो गाय देखोन ।। ९९ ॥ गारदी आल्यानंतर ।। दादा न बोले उत्तर ।। कैसे पडले हे अंतर ।। तेव्हां मनी खोंचले ।। १०० ।। नागव्या तरवारी घेऊन ।। गारदी आले चढ़न ।। मग दादाशी जाऊन ।। मिठी घातली रायांनीं ।।१०१।। राव विनवी दादास || तुम्ही समजावा गारद्यांस ।। जे मागतील ते त्यांस ॥ देऊन वाटे लावावे ।। १०२ ।। आम्ही गरीब ज्वान ।। द्यावे मनला जीवदान ।। मजला कैदेत घालोन ।। तुम्ही सुखे करावे राज्य ॥ १०३ ।। करा राज्याचा कळस ।। केला दादानी आळस ।। सुमेरसिंग ते वेळेस ।। नाहला निष्ठूर मारावया ॥ १०४ ।। देखोन गारद्यांचा भाव ।। न सोडी दादाशी राव ।। घाली तरवारीचा घाव ।। समरसिंग तेधवां ॥ १०५ ॥ काय पाहतोस म्हणन ।। तुळाजीने जाऊन ।। आणिले रायास ओढ़न ।। तेव्हां गेली शुद्धि ती ।। १०६ ।। संकट देखोन अनिवार ।। बोले चापाजी खिसमतगार ।। लहान लेकरूं सुकुमार ।। करुणा येऊ द्या काही हो ।। १०७ ।। न ऐके सुमेरसिंग ।। मारूं लागला निःसंग ।। जवळ होता खरगसिंग ।। त्याणे घर घेतले ।। १०८ ॥ होऊन सुमेरसिंग उदास || जाहला निष्ठूर मारावयास ।। मग धरिलें रायास || चापाजाने जाऊन ॥ १०९ ।। धन्य चापाजी खिसमतगार ।। जाहला जिवावर उदार ।। तेथे पडिला तो ठार ।। जो कां रायापाशी तो ।। ११० ॥ जन्मा येऊन सा. र्थक ।। दुसरा नारोबा फाटक ।। एका वाराने मस्तक ।। उडवून तेथे पा