पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५८) पांडुरंगकृत उत्तर । जेऊनियां आलिया नंतर । गोष्ट गेली आळसावर । नाही केला शोध तो ।। ६४ ।। जाणून विकल्प चित्तांत | राव गेले महालांत । परी लिहिले प्रारब्धांत । कदां काळी चुकेना ।। ६५ ।। पुरती बातमी घेऊन । राव निजले जाऊन | तुळाजीने जाऊन । गारद्यांस कळविले ।। ६६ ।। अशी सांगूनिया खबर । उठा म्हणती लवकर | तुमचा फितूर सविस्तर । कळला आहे वाड्यांत ।। ६७ ॥ लाग करा अशांत । नाहीं तर पडाल फाशांत । अवघ्या गोष्टी तशांत । त्या ही जाहल्या अनुकूळ ।। ६८ ॥ घेऊन सामान खबरदार । जाहले गारदी तयार । सुमेरसिंग नमादार | तो कां पुढे चालला ।। ६९ ॥ जाहले गारदी उतावीळ । होती जेवावयाची वेळ । दिल्ली दरवाज्याजवळ | येऊन ते का ठेपले ।। ७० ॥ चौकीदार होते दरवाज्यांत । नका जाऊं म्हणती वाड्यांत । हनीरी साठी आम्ही आंत । नातो असे बोलले ।। ७१ ॥ जाऊ न देती चौकी. दार । तेथे उपसोनिया तरवार । अधसिंग जमादार | तो का तेथे तोडिला ।। ॥ ७२ ।। ऐसी देखून मारामार | पळाले ते कां चौकीदार । आला गारद्यांचा भार | जिकडे तिकडे पळाले ।। ७३॥ठीक दोन प्रहरांत । करोनियां विश्वासघात । गारदी शिरले वाड्यांत । नाहीं खबर कोणासी ||७४|| हत्ती आंत यावयास | मोठा उंच करावयास । म्हणोन पाडिले दरवाज्यास । रायानी तो कां ऐका हो ।। ७५ ।। त्या दरवाज्यावरून । गारदी गेले चढून । सफेलीवर चढून । वाडा तो कां बळकाविला ।। ७६ ॥ गारदी मोठे अनिवार । करूं लागले मारामार । सन्मुख भेठला तो ठार । जिवे मारू लागले ।। ७७ ।। इच्छारामपंत पागा हुजुर । नो का अवघ्यांत महाशर । येत होता काम जरूर । रायापाशी जाण तो ।। ७८ ।। तुळाजी बोले गारांस | मारा रे या गुलामास । कैसी करुणा देवास | नाही आली तयाची ।। ७९ ।। हाणूनियां तरवार । हाता गाइ. चा आधार । म्हणनियां आड मोहरे । तेथें तरी वांचना ।। ८० || नाही पाहिले विचारून । जिवे गाईस मारून । तेथे पाडिला तोड़न । इच्छाराम पंत तो ।।८१ ।। मोठी गडबड देखन । गारदी आले थाटन | आबाजीपंत उठोन | गेला कवाड लावावया ।। ८२ ।। गारदी बोले दीन् दीन् । कवाडे लावितां तोडीन | आली वेळ कठीण । ठार तेथें पाडिला ॥३॥ नवल जाहले विख्यात | मारामारी वाड्यांत । खबर दिवाणखान्यांत । गेली रायापाशी ती ।। ८४ ।। उठा म्हणता रायास | नाही वाट जाण्यास । गारदी आले मारावयास | गारदी आले चहूंकडे ।। ८५ ॥ जवळ नाही चोपदार । नव्हती एक ही तरवार । पापाजी खिसमतगार। होता जवळ एक तो ।। ८६ ॥ रायाला तो नाहीं धीर । पडली मोठी फिकीर । नव्हते सदर बारगीर । केले दूर बापूनी ।। ८७ ॥ होता डोईस फेटा ।