पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नारायणराव पेशवे यांचे चरित्र. (१५७) राव वर्ती गेल्यावर । नाहीं दुसरा पाठीवर । राहिला एक संवत्सर । ज्याचे वय लहान ते ॥ ४० ॥ राव विनवी दादास । आतां सोडूनि रागास । राज्य आणूं रंगास । तुम्ही आम्ही मिळून ॥ ४१ ॥ न करावे अनुचित । तुम्ही आम्ही एक चित्त । करून आपले स्वहित । दोघे असूं एक मते ।। ४२ ॥ ऐसा सांगूनि अभिप्राय | गंगापुरा गेले राय । तरी दादाचा हा भाव । राज्य मी च करावे ।। ४३ ।। मग रचून फितुरास | कागद पाठविले हैदराबादेस । ती तो बातमी रायास । अवघी कळली यथास्थित ॥ ४४ । जाहाला चित्ताचा विक्षोभ । पण्यास आले ताबडतोब । मनीं धरूनि तो च क्षोभ । बंदोबस्ती केली ती ।। १५ ।। तें तो विघ्न निवारून | बंदोबस्ती हो करून । फितुरवाले धरून । किल्ल्यावरती घातले ।। ४६ ॥ नाही केला विवेक । करूनि कारखाना एक । सभोवते गारदी लोक । खडे पाहरे करविले ।। ४७ ॥ कोधे आकांतून जिवास | दादा करी उपवास । खेद जाणून चित्तास । तपश्चर्या केली ती ॥ ४८ ॥ तपश्चर्या अनिवार । केली दादांनी फार फार | म्हणती हा शिव अवतार | दादा तो कां क्षोभला ॥ ४९ ।। तप केले भोगून क्लेश | नाही पापाचा लवलेश । पुण्य जाहलें विशेष । संकट पडले देवाला ॥ ५० ॥ होता दादाचा हेत । राज्य करीन हाच बेत ।। म्हणोन देवाने हा हेत । त्याचा तो कां पुरविला ॥ ५१ ।। भोगूनियां तपास । कैसे करविले पापास । ब्रह्महत्यादि दोषास । त्याचे मागे लाविले ।। ५२ ॥ देव मोठा चतुर । कैसा करविला फितुर । लिहून आपले स्व. दस्तूर | दिल्हे कागद दादांनी ।। ५३ ॥ मोक्षपद प्राप्त त्यास । नऊ लक्ष रुपये पगार गारद्यांस । आणखी देऊन किल्लयास । केले ते कां संतुष्ट ।। ५४ ।। देऊन रुपये केले संतुष्ट । जे कां मिळोन खळ दुष्ट । कैसी पडली ही जूट । ऐसे महा घातकी ।। ५५ ।। खरगसिंग जमादार । जुना चाकर करार । सुमेरसिंग निर्धार । महा खळ दुरात्मा ॥ ५६ ॥ गारदीयांचा कुळअखत्यार | महंमद इसफ सरदार । आणखी तुळाजी पवार । तो कां त्यांसी मिळाला || ५७ ॥ ज्याचे खादलें अन्नास | फिरून पडले हो त्यास । जन्मोजन्मी नरकवास । कदाकाळी चुकेना ।। ५८ ॥ असे गारदी महा खळ । कैसा साधूनियां वेळ । जैसे ते काग तात्काळ । तैसे ते कां धांवले ॥ ५९॥ सकाळी राघोजी आंग्र्यास । गेले होते भेटावयास | दोन घटका दिवसास । गेले होते स्वारीला ।। ६० ।। आले त्यास भेटून । देवीचे दर्शन घेऊन | आले पर्वतीहून | लवलाहे वाड्यांत ।। ६१ ॥ उशीर जाहला स्नानास । लौकर बसले भोजनास | मेजवानी गोसाव्यांस । उद्यां करूं म्हणोन ।। ६२ ।। जेवते वेळेस गुणगुण । कळली राया लागोन । हरिपंताला बोलावून । म्हणती आणावे मनास ।। ६३ ॥ बोले हरिपंत