पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५६) पांडुरंगकृत ॥ १६ ।। अहो नाना फडनीस | आले रायाचे मर्जीस | कारभारी वांकनीस । ज्याचा बंदोबस्त बहुत असे ॥ १७ ॥ हरिश्चंद्र जैसा वीर । तैसे ते कां सत्वधीर । ने कां उदार गंभीर । कचिये सारिखे ॥ १८ ॥ नित्य करिती दान धर्म | स्नानसंध्यादि षट्कर्म । काम क्रोधादि काम । ज्यांचे शरीरी न राहे ।। १९ ॥ अखंड देवाचे भजन | नित्य करिती विष्णू पूजन । शालिग्राम देवतार्चन । जो कां ब्राम्हणभक्त तो ।। २० ।। त्याचे स्वरूप सुंदर । जैसा उगवे भास्कर । मी वर्णं कोठवर । जैसा दुसरा मन्मथ ।। २१ ।। तेवी ही शोभा सुलक्षण । त्याची बुद्धि विलक्षण | करी ब्राम्हणसंरक्षण । आणखी प्रजापालन ते ॥ २२ ।। बाजीरायाचा पुत्र । तेणें केलें कलहसूत्र । दादा जाणते सपुत्र । तपश्चर्येचे बळे ॥ २३ ।। मग गेले आनंदवल्लीस । लागनि लोकांचे बद्धीस । नाही गेला तो सिद्धीस । मग त्यांचा मनसोबा ।। २४ ॥ फौजा तमाम धरोन । माधवराव यासी बोलावून । युद्ध केले दारुण । शेवटी आले अपयश ।। २५ ।। तेथे दगा देऊन । सरदार गेले पळून । किल्यावरते चढून । मग केली बळकटी ।। २६ ।। नाही कोणी दुसरा साह्य । तेथे न चाले उपाय | फत्ते केली लवलाय | किल्ल्याखाली उतरविले ॥ २७ ॥ राव घेऊनि दादास । मग हो आले पुण्यास । आणूनि वाड्यामध्ये त्यांस । मग केली बळकटी ।। २८ ।। मनीं धरूनि तो च राग । केला संपत्तीचा त्याग | अनुष्ठान यथासांग । आराधना सूर्याची ।। २९ ।। पुत्र नानाचे जाण । त्यांचे ऐकावे वर्तमान | दोघे अवतार समान । जैसे रामकृ. ण ते ॥ ३० ॥ ज्याचा पुण्यप्रताप | सटे बहुतांसी कांप । शरण गेलिया करिती माफ । त्याच्या दहशतीनें ।। ३१ ।। माधवरायाचे पुण्य । कोठे. न पडे कांहीं न्यून । किती आठविती अझून । तैसा नाही होणार ।। ३२।। दुर्जन खळांते नासून । काया कष्ट ते सोसून । नाना गेल्या पासून । राज्य त्याने राखिले ।। ३३ ।। थेऊराचे मुक्कामास । बोलावूनि त्या दादास । दिल्हे हाती रायास । राज्य सुखी करावे ।। ३ ।। सर्व मुत्सदी मिळून । केले बापूसी दि. वाण | नारायणरायासी जाण | बापसी फार निरविले ।। ३५ ।। हे असे अज्ञान वाळ ! तुम्ही करावा प्रतिपाळ | नानापरि सांभाळ | तुम्ही आधी करावा ।। ३६ ।। रमाबाई वारंवार । निरवी दादासी फारफार | तुम्हाविण दुसरा आधार । नाहीं याजला कोठे तो ।। ३७ ।। सांगून गेले कैलासास | विसरून रायाचे दुःखास । त्याचे मागे नवमास । राज्य केले चांगले ॥ ३८ ॥ नारायणराव माधवराव । दोघे होते बंधु राव । त्यांचे दहशतीने काय । फितूर कोणाचा न चाले ।। ३९ ।। २. षट्कमैं-अध्ययन, अध्यापन, दान, प्रतियह, यजन, याजन ही सहा कौ. ३. भास्कर-सूर्य.