पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५५) पांडुरंगकृत नारायणराव पेशवे यांचे चरित्र.* (मओवीबद्ध.) बदूंनी आधी श्रीगजानन | चौदा विद्यांचे जे निधान । हरिहर ब्रह्मा चतुरा नन । नमन करितो तयांचे ॥ १ ॥ पेशव्यांचे वंशी वीर । एका पेक्षा एक धीर । धीर मानव वीर । क्षत्रिय ऐसे जन्मले ॥ २ ॥ बाजीराव मोहरा सुंदर | चिमाजी आप्पा सहोदर । मोठा कठीण काहार । राज्य केले वक्राने ॥ ३ ॥ त्याचे पुत्र धुरंधर । नाना भाऊ बंधु थोर । अवतरले जगदीश्वर । गोब्राम्हणरक्षणार्थ ॥ ४ ।। मन्मथ स्वरूप रवितुल्य । दान धर्म कनकातुल्य । देवालये आणि पूल । ठायी ठायों बांधिले ॥६॥ संतति संपत्ति आणि उल्हास । बहुतां परो भोग विलास । रिद्धिसिद्धिवाल्यास । उपमा द्यावी काणती ।। ६ ॥ बाजीराव याचा धाकटा सुत । त्याचे ऐकावे कौतुक । पहिल्या पासून प्रत । होती ऐसी तयाची ॥ ७॥ विश्वासराव भाऊसाहेबास । ते हि राहिले पानपतास । त्याचे काळजीने उदास । मन जाहले बहुतांचे ॥ ८॥ सर्व संपत्ति करून त्यागास | नाना गेले कैलासास । राघोबा दादा त्या समयास । राज्यासनी स्थापियले ।। ९ । माधवराव यांनी केले राज्य । नाना मागे साम्राज्य । शरीरभोगें केले काज । म्हणोन देह त्यागिला ॥ १० ॥ राज्यकारभार चालवायासी । स्थापूनि नारायणरायासी । राघोबा दादा त्या समयासी । आणखी होते मुत्सदी ।। ११ ॥ राव विष्णूचा अवतार । त्याचा पराक्रम फार । कलियुगी साचार । महा दुष्ट जाणती ।। १२ ।। कैलासी गल माधवराव । त्यांचे मागे नारायणराव । त्यांचा ऐकावा अभिप्राय । जो कां सकळीक ।। १३ ।। अहो शिक्षेकट्यार । दिल्हा राज्याचा अधिकार । वस्त्र भूषणे अलं. कार । दिल्ही पेशव्यांची ।। १४ । राज्य करी एक निष्ठ । जो कां असे कर्मनिष्ट । सभाश्रित पंडित शिष्ट | ब्राह्मण गही असती ।।१५।। राज्यादिकांचा कारभार । सखाराम बापू कुलअखत्यार । हरिपंतावरी प्यार । तो को मित्र जिवाचा

  • या ग्रंथाच्या दोन प्रति आमचे जवळ आहेत. पैकी एक खर्ची २७ बंदांवर लिहिलेली आहे व दुसरी काळचा पातळ फुलस्केप कागदाच्या १७ बंदांवर लिहिलेली आहे. दोहीची लिपि मोडी असून बंदांच्या एका बाजूस मात्र लिहिलेले आहे. खची बंदांवरची बखर शके १७६२ शार्वरी नाम संवत्सरी फाल्गन वद्य १३ मंदवारी तिसरे प्रहरी लिहून समाप्त जाली असा तिचे शेवटी लेख आहे. फुलस्केप बंदांवरची बखर शके १७८३ दुर्मती नाम संवत्सरी भाषण शु. १३ रविषारों सायंकाळी समाप्त जाली असा तिचे शेवटों लेख आहे. हिचे हस्ताक्षर गणेश भिकाजी भुसकुटे राहणार मु• पुणे पेंठ शनिवार ओंकारेश्वरानजिक केळकरांचे वाड्यांत राहणार यांचे आहे. १. मन्मथ मदन.