पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५४) मुक्तेश्वरकविकृत-शतमुखरावणवध भूरमा गंगा विशाळरूप । उपमा येतां दिसे स्वल्प | योगमायेची लाला अमुप । ब्रह्मादिकां नानुमाने ।। १६ ।। विशाळ रूप नग अनेक । आटोनी पूर्वाकृती कनक । सीता होतां रविकुळटिळक । लंकापुरी चालिले ।। १७ ।। कपीतनजाहाजी सहपरिवार । बैसतां ची जलधिजावर । आज्ञावाते करूनी शीघ्र । मार्ग अंबुधी लंधिला ॥१८॥ हनुमंतें चरणमंदरगिरी | बंदुनी श्रीराम आज्ञा शिरी । लंकाक्षीराब्धीच्या तीरी । उचलोनियां ठेविला ॥ १९ ॥ एका पदें लंकाद्वारी । कपी प्रविष्ट जालिया वरी । तळी उतरोनी समस्त वीरीं । पौडक आणिला धरोनी ॥ २० ॥ त्याचा करावा जो घात । तंव तो म्हणे मी शरणागत । हे एकोनी जनकजाकांत । राक्षसाते रक्षीत ॥ २१ ॥ पितामहबंधु अनुदिन । होउनी पाळी आमुच्या वचना । हे ऐकोनी श्रीरघुनंदना । पौंडक नमी सद्भावें ।। २२ ।। अवलोकोनी कृपादृष्टी । बिभीषण स्यापिला राज्यपीठौं । येरी जोडि. स्या करसंपुटीं । राघवा नमिले साष्टांगी ।। २३ ।। मग परिवारेशी कौशल्या तनय । वळंघे कपिकायाय । अयोध्यापरी वेगीं नाय । निमिषार्ध न लागतां ।। २४ ।। कपिचरण उभयसरिता । शरयतीरी संग होतां। अवलोकोनी त्रिवेणी सरिता । रामसेना उतरली ।। २५ ॥ जिरउनी ब्रह्मद्रोही सर्व । हनुमंत आला यथापूर्व | आज्ञा घेऊनीयां सर्व । जाते जाले स्वस्थळा ॥ २६ ॥ श्रीराम प्रवेशले राउळ । होता जाला प्रातःकाळ । स्नान करूनी उतावळ ! जप जाप्य कर्म स्थापिलें ।। २७ ।। पंक्ती घेउनी दीजोत्तमासी । साधनी साधली द्वादशी। भोजन करूनी सखैकराशी । सिंहासनी बैसले ॥ २८ ॥ श्रीरामप्रतिज्ञा द्राक्षावल्ली । कपितनुमंडपी विस्तारली । शक्ति सामर्थ पीयूष फळी | सत्कीतिघास प्रसवली ।। २९॥ हनमंतनाटकीची कथा | महाराष्टभाषा यथार्थ उलथा । विश्वभर जाला वक्ता । मुक्तेश्वर अनवादे ।। २३० ।। इति श्रीहनुमंतनाटकांतर्गत शतमुखरावणमर्दन संपूर्ण ।।