पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शतमुखरावणवध. (१५३) च चि दिसे रघुनाथ मूर्ती । किंवा संकट पडले पती । ह्मणोनी स्वप्नी दिसत आहे ।। ९५ ॥ रघुनाथ म्हणे हे मायापुर । मी साच कौशल्याकुमर । युद्धी संकट पडले थोर । म्हणोनी तुम्हांसी आणिले ।। ९६ ।। असंख्य माझे बाणभार । गिळीत शतमुख अजगर । जैसा जळचरां राक्षसढिवर । उचलो नेदी मस्तक ।। ।। ९७ ॥ निशाचरम्हसा येई क्षिती । जिणोनी गांजिल्या सैन्यपंक्ती । तें तुवां परंज्योती । सामर्थ्य मूळ निवटावे ।। ९८ ।। आतां न लाउनी उशिरा । निधन मद्य शतशीर्ष असुरा । की अमृतपान आम्हां सुरां । जगन्मोहनी वाढी कां ।। ।। ९९ ।। यापरी वृत्तांत श्रवण स्तवन । करूनियां स्तुती पूजन । वर्णोपचार मेळवून । सांगोपांग मांडीले ।। १०० ।। हरिहराचे ध्यान मूर्ती । जय जय चिद्रूप मूळशक्ती । जय जय अनादिशक्ती । परात्परे तूज नमो ॥ १ ॥ ब्रह्मांडघट प्रसवती धरे । जय जय अरूप लावण्य त्रिपुरे । जय जय निर्गुणबीजाकारे । अनरामर तुज नमो ।। २ ।। समाप्त होतां स्तुति पूजन । नवेद्य अर्पिला धनुष्यबाण | साष्टांग घालोनी लोटांगण | कृपा करी म्हणतसे ।। ३ ।। ते देखोनी भक्ति अनन्यता । संतष्ट जाली जगन्माता । ह्मणे उगऊं नेदी सामर्थ्यसविता । निशा चरतमनाशिनी ॥ ४ ॥ ऐसे बोल बोले महाशक्ती । आली रणभूमी भोवती . चौमुजांची आकृती । धरती जाली भ्यासूर ॥ ५ ॥ पाशांकुश धनुष्यबाण - करी वसवी तो रणस्फुरण । पातले ते वजठाण | मांडोनियां ठाकली ।। ६ ।। मग संहारवन्हीची ज्वाळा । दीर्घ वाढली अंतराळा । राक्षसकुळप्रळयजळा । शाषावया लागोनी ।। ७ ।। ब्रह्मांडाशी महदाकाश । गिळी ऐसा अद्भुत वेश । देखोनी त्रास पावे शेष । सरवर चळचळा कांपती ।। ८ ॥ शतमुख लक्षनीयां सन्म. ख । कार्मुकीं एक ची सौयक । लाउनी सोडितां एक एक । प्रसवनी जाले शतवरी ॥ ९ ॥ झगटोनी शतकंदरीं । शिरे उडविली गगनोदरी । गरगरां भोवोनी अंबरी । पुनरपी पाडिला अवनिये ।। १० ।। चाप मंत्रोनी यंत्रगोळ । उलटोनी केलें एक मौळ । पडतां राक्षस प्राण जळ । आटोनी गेले निःशेष ॥ ११ ॥ भ्यासर राक्षस कलेवर । अंकुशे केले शत ज. र्जर । अंगलंग निशाचर । मारूनी केले निबीज ।। १२ ।। मायापरी अक्षोभजळे । पोशिली होतीं शतमुखकमळे । ती चापशरकरांगुळे । सीतादेवी धुंडाळी ।। १३ ।। अंबरी तोषोनी सुरवर । भूतळी सांडिती पुष्पभार । सकळां मुखी जयजयकार । घोष झाला ते काळीं ॥ १४ ॥ मग जनकजा परब्रह्मशक्ती । परिमार्जुनी दीर्घाकृती । येउनीयां पूर्वस्थिती । रघुनाथ अंकी आरूढली ॥ १५ ॥ ५०. सविता-सूर्य. ५१. कार्मुक-धनुष्य. ५२. सायक-बाण, ५३, अंबर=आकास. ५४. अवनि पृथ्वी. ५५. कलेवर शरीर.