पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शतमुखरावणवध. (१५.) शीर्षकणां झोबिला ।। ५४ ।। सावध होउनी निशाचर । पाचारूनियां समस्त वीर । ह्मणती शत्रुभूतसंचार । नरां वेष्टित दिसत आहे ॥ ५५ ॥ शीघ्र हारावयातें बांधा । तुह्मीं गेले पाहिजे युद्धा । ह्मणे काळकेतु प्रबुद्धा ।। प्रधानाते आज्ञापी ।। ५६ ।। शूर पंचाक्षरी काळिक | आंगबळे तो मांत्रिक । घेउनी महावीरांचे कटक । वैरियां उजू लोटला ।। ५७ || देखोनी श्रीरामसैन्यभूता। टाकिती श्रीबाणास्त्रमंत्रा । येरी गणून निर्भयता । वैरियां उजू लोटती।। ५८॥ हनुमंत महाभूतात्कार । देखोनी भ्याले निशाचर | कोळकेते धरूनियां धीर । युद्ध केले सैत्राणे ॥ ५९ ।। त्यांत श्रीराम महाकाळे । घालोनियां बाणजाळे । तनुजळाहूनी वेगळे । प्राण मत्स्य टाकिले ॥ ६० ॥ काळकेतक पावतां मृत्य । अंगलंग पळोन जात । शतशीर्ष मुख्यालागी मात । सांग सांगितली युद्धाची ।। ६१ ॥ म्हणती आम्ही वीर विखारी । वाणरदें शत्रुजिहरीि | डंखिले परी ते धन्वंतरी । शस्त्रविष बाधू नेदिती ।। ६२ ।। हे देखोनी महानट । उसळे मैं कालेयकालकूट । त्यांत श्रीराम नीलकंठ । कोठोनी केले निर्माण || ६३ ॥ वृत्तांतघृत श्रवणकुंडों। पडतां क्रोधाग्नि धडाडी । कुशब्दजाला मिती तोडी । रणांगी पातला ।। ६४ ।। देखोनी मानवांचे वृंद । शतमुखे केला सिंहनाद । मग अति दुर्बाध दुर्मदें । राघवा उजू तळपत ॥ ६५ ॥ सिंह भक्षावया मृत्यु फळे । जाले तुम्हासी डोहळे । की पाश घालोनी मृत्युकाळे । भेटावया आणिले ॥६६॥ तुटली आयुष्याची दोरी । मृगे शिरती शबैराघरीं । सिंह वसे त्या कांतौरी । गजभार येती चरावया ।। ६७ ।। रामा नोहे हे लंकापुरी । प्रत्यक्ष काळ व्याघ्राची दरी । येथे तुम्ही मानववीरों । येइजे हे अपूर्व वाटे ।। ६८ ॥ दवडावया प्राणदैना । मागों आलेती मरणधना । तरी स्वहस्तकी मृत्युदाना । देतसे तुम्हां सकळांतें ॥ ६९ ॥ ऐसे बोलोनी दुराचारी । वर्षा लागला खदिरांगारी । ते लागो. नी सर्व शरीरी । रामसेना पोळली ।। ७० ।। घाये परिवार जाला भस्म । अरी वर्म देखोनी मेघश्याम । शरधारांचे अपार स्तोम | शतमुखक्षिती रिचवीत ।। ७१ ।। बाणसर्प सोडी उदंड । तितुके खंडी निशाचरगरुड । राम शर वर्षला उदंड । प्रळय रुद्रा सारिखा ।। ७२ ।। परीवर्जताराची हारी । पास्ते पाडती वदनागारों। शतमुखवनही कुंडामाझारी | सायकतृणे भस्मती ।। ७३ ।। आश्चर्य करती अंगलंग । विश्वतश्चक्षु जाला दंग । तो नारद म्हणे प्रयोग । असे याचा निराळा ।। ७४ ।। तुजसारिखे जगजीवना । जेथुनी अवतार निघती नाना । आनंद २१. केत=केतु=निशाण. २५. सत्राण-नेट. २६. विखारी साप. ९७. रद-दांत. २८. जिव्हार-मर्मस्थान. २२. धन्वंतरी=ौद्य ३०. कालकूट-विष.३१. शबर=मिल्ल. ३२. कांतार-राम. ३३. भार-जमाव. ३१. स्तोम-जमाव. ३५. विश्वतश्चक्षु-सर्व पहाणारा-राम.