पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मूखींची लक्षणे. (१४७) नपुंसका पाशी पाठवी सुत । शूद्राहाती अभ्यास करवीत । तो एक मूर्ख जाणावा ।। ८७ || बहुत काम बहुत कोप । बहुत निद्रा बहुत जैल्प । बहु आहार बहुत विकल्प । तो एक मूर्ख जाणावा || ८८ || उत्तर काळी करी लग्न । जीविकेवीण बांधे सदन । प्राणत्यागी न वेची धन । तो एक मूर्ख जाणावा ।। ८९ ।। बोल बोलुनी सांडी | मध्ये च व्रतनेम खंडी । स्वदत्त परदत्त विखंडी । तो एक मूर्ख जाणावा ।। ९० ।। अनुचित कर्मारंभा करी । स्वजनासी विरोध करी । स्त्रीजनासी विश्वास धरी । तो एक मर्ख जाणावा ॥ ९१ ॥ आपण नेणे शिकविले न करी । विद्याधनावीण अहंकारी । जनी बळे पारखांड करी । तो एक मखं जाणावा ।। ९२ ।। जेठियांशी झोबा घेणे । व्युत्पन्नाशी वाद सांगणे । धनवंतरीशी हो. बांधणे । तो एक मखं जाणावा ।। ९३ ॥ झोपी जाय घोड्यावरी | आडसांगडी निघे पूरी । रोग परीक्षेवीण औषध करी । तो एक मूर्ख जाणावा ।। ९४ ।। राजगृही पैशून्य बोले । परनाश देखूनि हरिखें डोले । स्वशक्ति ऐसे मित दर* बोले । तो एक मूर्ख जाणावा ।। ९५ ।। बोजा भक्षुनि लावी ज्ञान । ममता अंगी कथी ज्ञान | बोल आणि करणे वीण | तो एक मूर्ख जाणावा ।। ९३ ।। सापत्नमाता कन्या भगिनी । स्नुषा दासी परस्त्री तरुणी । ए. कटगहीं एक शयनी । समीप धांवे तो एक मूर्ख ।। ९७ ।। भाग्ये माजे दरिदै शिज। परकीर्ति ऐकानि मत्सर भजे । निंदितयाते निवेद नवाजे । तो एक मूर्ख जाणावा ।। ९८ ।। गर्व करी संतभजनी । विश्वासुनी महंतसंतवचनी । दोषारोपी साधूचिये गुणी । तो एक मूर्ख जाणावा ।। ९९ ॥ निंदूनि स्वहितधर्मा । स्तवी अविहित परधर्मा | तो चि आचरे परधर्मा । तो एक मूर्ख जाणावा ।। १०० ।। विलंबे धन प्राप्त संकटीं । त्याची दुराशा धरूनि पोटीं | प्रयत्नालागी होय हिंपटी। तो एक मर्ख जाणावा ।। १०१ ।। उपजोनियां संसारी | आयुष्य वेची विषयावरी । आत्मप्राप्ति नव्हे पुरी । हे नेणे तो मूर्ख ।। १०२ ।। आत्मप्राप्तीचे साधन । एक चि मानुनी गृह जाण | यासि वैराग्य मुख्य कारण । हें चि नेणे तो मर्स ।। १०३ ।। हरिहरनामा परते आन । नाहीं प्रायश्चित्त गहन । हे विश्वासे न मनी ज्याचे मन । तो एक मूर्ख जाणावा ।। १०४ ।। काशीमरणे विष्णुस्मरणे । मोक्षप्राप्ती वेदवचनें । याते अर्थ दुजे म्हणे । तो एक मूर्ख जाणावा ।। १०५ ।। सर्व भूती भगवंत परिपूर्ण । सर्व दया हे ज्ञानभूषण । हे विश्वास न मनी जयाचे मन । तो एक मूर्ख जाणावा ।। १०६ ।। सन्यासी आणि सलिंबी । गृहस्थ आणि २७ जल्प बडबड. २८ विकल्प-संशय.. २१ धन्वंतरी वैद्य. ३० होड-पैज. ३३ हरिख आनंद. * आमच्या पोथींत बरेच अपपाठ आहेत तेथे दुर्बोधता राहिली आहे. ३२ स्नुषासुन. ३३ शिजेसंतापे. ३१ नवाजे-स्तुति करी. ३५ सालंबी साश्रय, आसक्त.