पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुखांची लक्षणे. (१४५) टीमाजी रिघे देउळी । तो एक मूर्ख जाणावा ।। ४६ ।। बोल न खंडितां दुजयाचा । आपण असत्य करी वाचा । आपण मध्ये च संचरी वाचा । तो एक मूर्व जाणावा ।। ४७ ।। न बोलविता परगृहा जाणे । न पुसतां मात सांगणे । समर्थ प्रभु सोयरा ह्मणे । तो एक मूर्ख जाणावा ॥४८॥ आपण नेणे सारासार । नायक श्रेष्ठाचा विचार । बोले तांतडीभरे थोर । तो एक मूर्ख जाणावा ।। ४९।। वडला जरी उपकार नाठवी । अपकार तो जीवों आठवी । आपुले केले ते मुखी रूढवी | तो एक मर्व जाणावा ।। ५० ।। पंक्ति करूनि कदन्न वाढी । आपण सदा मिष्टान्न झोडी । मज न साहे हे संपादी प्रौढी । तो एक मूर्ख जाणावा ।। ५१ ।। मळीण वस्त्र अंग मळीण | न करी करपाददंतधावन । भक्ष भक्षी स्नानावीण । तो एक मूर्ख जाणावा ।। ५२ ।। समर्थ शेजे बांधी घर । बळवंताशी अर्थव्यवहार । राजपुरोहिताशी राजमत्सर । तो एक मूर्ख जाणावा ॥ ५३ ॥ पुढे स्तुति मागे निंदा । स्वल्प अपराधे चढे क्रोधा । समयीं जो न मिळे संवादा । तो एक मूर्ख जाणावा ।। ५४ ॥ एकांत करितां दोघेजण । समीप जाऊनि लावी कान । श्रेष्ठत्व आधी इच्छी मन । तो एक मूर्ख जाणावा ॥५५ ।। अकारणे हांसे बहु हांसणे । हांसत चि गोष्टी सांगणे । कोही न हांसतां बहु हासणे | तो एक मूर्ख जाणावा ।। ५६ ।। प्रभु हांसतां आपण हांसे । जेठा घा. लूनि सभे बसे । प्रभु देखोनि आपण हांसे । तो एक मूर्ख जाणावा ॥ ५७ ।। मळमूत्र सारी जनाचिये दृष्टि । जपतप नाही लोकांचे दृष्टि । सभेत फळ तांबूल एक दिठी । तो एक मूर्ख जाणावा ।। ५८ ।। बहु व्यवसायी ऋणग्रस्त । द्विभार्यापति व्याधिस्त । यांचिया वचनी विश्वासत । तो एक मूर्ख जाणावा ।। ५९।। परगुणपरीक्षा परवेदना । हे दोन्ही नकळे ज्याचिया मना । त्याचिया संगती सुखवासना । इच्छी तो एक मूर्ख ।। ६० ।। अल्प पडदणी अल्प वसन । अल्प पा. त्री बहु भोजन । अल्प स्त्रीस दाखवी मन । तो एक मूर्ख जाणावा ।। ६१ ।। गृह त्यागनि मठाची माया । शियिणी करून त्यागी जाया । सुहद त्यागूनि शिष्य समुदाया । तो एक मूर्ख जाणावा ।। ६२ ।। परोपदेशी कुशळ भारी । आपण अधर्म अकर्म करी । त्याच्या वचनाचा विश्वास धरी । तो एक मुर्ख जाणावा ।। ६३ ।। तोडे म्हणे सर्व ही ब्रह्म | आचरे वेदविरुद्ध कर्म । त्याचा शिष्य होय तो परम अधम । महामूर्ख या नांव ।। ६४ ।। स्त्रियेचे वचन घेऊनि कानी । दु हावी पिता बंधू जननी । वेगळा राहे सुहृदांतुनी । तो एक मूर्ख जाणावा ।। ६५ ।। अर्थ अथवा वृत्ति स्वार्थ । व्यवहारा बोलावी बापभावांत । अपाय चिती आप्तांत | तो एक मूर्ख जाणावा ।। ६६ ।। मायबापाची हेळणा करी । 1 धावन धुणे. १७ शेज-शेजार. १८ अर्थ-पैसा. १९ व्यवसायी उद्योगी,