पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३८) मुक्तेश्वरकृत दर्प करोनि कानवडा । त्यावरि उडी दानि सरडा । पडतां वेळ लागे केव्हडा । वीर्यस्खळन त्या योगे ॥ ३६१ ।। कळे न कळे ऐसा संतोष । होवोनि नासतां न लगे निमिष । सेखी दुःख उरे अशेष | महा पुण्य क्षय करी ।। ६२ ।। वृश्चिकनांगीवरी मधुबिंदु । देखोन धांवे बुद्धि मंदु । चाखो जातां खेदु । ओग आला अपार ॥ ६३ ॥ नातरी खड़ाचिये धारे । साखरमाखिली ते पामरे । चाखो जातां जिव्हा चिरे । मुख केउते कळेना ।। ६४ ॥ तैसें स्त्रीसंगे जे सुख । ते आडनांव मात्र देख । विषे मरण तैसें द:ख । प्राप्त होय निर्धारें॥६५ ।। स्त्रीरमणी होय सुख । तें मिथ्या नेणती मूर्ख । स्त्रीचा संग मात्र देख । होतां तोष तेथे नाही ॥६६॥ शिवणीमाजी योनिस्थान । तेथे बिंदचे आगमन । होतां कंडू उद्भवे गहन । मथुनानंद ज्या ह्मणती ॥ ६७ ॥ योनीबिंदची भेटी । सरतां देहीं अल्हाद उठी । ते दोन्ही स्तनी परुषानिकटी। बजती पोटी कळाविद ॥ ६८ ।। म्हणून तिळतुल्य सुखाचिये चाडे । सकृत नासे मेरूएवढे । जाणोनि स्त्रीदेह दाभाड । नातळती सज्ञान ।।६९ ॥ विष्टा सकरासी च गोड । श्वानासि स्वादिष्ट हाड । तैसा विषयासक्तमढ । तो लोलप स्त्रीसंगा ।। ७० ।। ऐशी वचने शुकमुखी । निघाली जैसा वर्षाव पीयषी२९ । परी ती अपमानासारिखीं । रंभच्या मानला ॥ ७१ ।। मग उत्तर देत निगती। मागां दषिली त्याहना मी परता। एस विस्तारित अर्थी | श्लोकसंकेत बोलता ।। ७२ ॥ रंभा म्हणे योगीराया। आपल्या मानुषी नाया । तयांसारिखी माजी काया । नव्हे हे काय नेणसी ।। ७२ ॥ वस्तुवस्तूसी अंतर बहुत । ऐसें जाणती परीक्षावंत । एन्हवीं कुरूप खरूपवत । गभांध काय ओळखें ।। ७४ || उच्चैःश्रवा रवीचे रथीं । द्वयसहस्र आगळ द्वय शती। दोनो योनने व्योमपंथीं। निमिषार्धं जो क्रमी ।। ७५ ।। तया एस माझे घोडे । ऐसें नर मो बोले तोडे। तया तव्य आन वेडे. | काण सबलाक्या ।। ७६ ।। काळ खड़ा ऐसी विळी । किंवा असिलते सारखी पळी | गजवलीसी भिडे कोहळी । डोकेतवानेसदर्पण || ७७ || ऐरावती दवद्राचा । समुद्रमथनी उद्भव ज्याचा । तो वनकंजरासमान साचा । म्हणे तो काय विवेकी ।। ७॥ चंदन चदे देवनिळा । येक काष्ठ पडे पायखाळा । कप तरूसम बाभळा । की केळ तैसी रुद्र तोडे ।। ७९ ।। अश्वत्थ लावूनि गंगातीरी । प्रदक्षिणा करिती पुरुषनारी । त्यांचे संकल्प क्षणामाझारी | सिद्ध होवानी प्रत्यक्ष ॥८० ॥ आणि लाविले मद्योदकाचे काष्ठ । स्रवती साध्वाचे लोट । तयाऐसा तरुवरिष्ठ । हरिव्रक्ष केंवि सांगें ।। ८१ || माणिक मुक्ता पाच पेरोन । नीळ वैडूर्य पुष्कराज । गोमेद प्रभाकर मरगज | पद्मराग महामणी ॥ ८२ ॥ २८ विद-जाणते. २९ पीयूष अमृत. ३० असि-तरवार.