पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रंभाशुक-संवाद-(ओव्या.) (१३९) परिस चिंतामणी ज्या म्हणती । जे हे एक पाषाण नाती । म्हणोनि गारेसाठी देती । ते मूर्ख की शहाणे ॥ ३८३ ।। भरित जांबुनदाची तगटे । पाळवी मुक्ताफळ चोखटे । ऐशा दिव्यांबरेशी रगटें । काय तुळणे ते पावे ॥ ८४ ॥ करोनी शरीराचा चुना । शतयागांचा तांबूल जाणा । देवुनी उर्वशी. च्या स्तना। स्पर्शावया अधिकार ।। ८५ ।। आणिक एक परीचे जाडे । कच्छ फेडुनी रिघे फुडे । त्या मनुष्यदारेचे नि पौडे । दिव्यांगना केंवि होती ।। ८६ ।। उदार धीर पवित्र ज्ञानी । दयाशीळ यशस्वी जनीं । शापानुग्रह महामुनी । मूर्त अवतार विष्णूचे ।। ८७ ।। कपण अधीर दोषी मूढ । विश्वपीडक अकीर्ति काबाड । आचारभ्रष्ट पाषांडी जड । मुख्य अधिकारी नरकाचे ॥८८ ॥ येकाचे नामे जळती दोष । दर्शन जोडे सिद्धिका मोक्ष । ऐसे महानुभाव पुरुष । संगें लोकां सुखकारी ।। ८९ ॥ येकाचे स्मरणे पापप्राप्ती । दर्शने नरकासी नेती। संग पडतां दुःखावर्ती । ते अधम उत्तम कैसेनी ॥ ९०॥ येक प्रतापें जिंकोनि क्षिती । येक हरविती वडिलांची वृत्ती । येकाते म्हणती चक्रवर्ती । येक भक्षिती कोरान्न ॥ ९१ ॥ येक सुपुत्र कुळाते तारी । येक पूर्वज पाडी अघोरी । म्हणोनि अधर्म पुरुषा सरी । नाहीं जाणा निर्धारे ॥ ९२ ।। विष्णुतीर्थे वैकुंठ जोडे । सुरापानी रौवीं पडे । दोन्ही उदके येका पाडे । ह्मणती मूढा नाडली ।। ९३ ।। मंदाकिनी आणी वतरिणी । सारिख्या मणती पापी प्राणी । जगें नाहिने नान्हवीजीवनीं । कर्मनदीते नातळती ।। ९४।। म्हणोनी वस्तुवस्तूसी पाहे । अंतर महदंतर आहे । ऐसें जाणे तो चि लाहे । चतुर नाम विलोकी ।। ९५ ।। तेंवि आम्ही देवांगना । पुण्यावेगळ्या न: कवणा । मानिनीच्या देहदूषणा । काया अमुच्या नातळती ।।९६॥ प्रत्यक्ष पाहीं माजे रूप । दिव्य देही लावण्यदीप । येथीचे सुरत सुख अमूप । तें स्वानुभवें जाणावे ॥ ९७ ।। हे आनंदरसाची कृपिका । गोडी आणी सर्व सुखा । चाखानियां अधरी पीयूषा । प्रतीति पाहे ययाची ॥ ९८ ॥ मग ग्राहीक होई शरीरा । संतोष देईन तनुअंतरा । माते अव्हेरितां चतुरा । महा हाणी समान ॥ ९९ ॥ ऐसी रंभा अनुवादली | परी शुकाने धिःकारिली । जैसा नृसिंहउपासक छळी । महाभूती छळिजेना ।। ४०० ।। पुढती तिच्या कर्णकुंभा । भरिता झाला वैराग्यअभी । ज्या तिरस्कारे लाजोनि रंभा । हृदय फाडी आपुले।। १।।शुक म्हणे रंभे देख । कामें पुरुष झाला मूर्ख । वरी वरी लावण्य सुरेख । कामिनीचे देखोनी ॥ २ ॥ चाफेगोरटी सुकुमारी | डोळस श्यामांगी सुंदरी | वदनी कुंकुम केशरी । उटी ३१ जांबूनद=सोनें. ३२ पासमान, सारखी. ३३ मंदाकिनी गंगानदो. ३४ वैतरणी= यम लोकची नदी. ३५ अंभ पाणी.