पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रंभाशुक-संवाद. (ओंव्या) (१३७) कोदला मुसे । ऐशा सुखाचे दिवसे । अविद्याराती हरपली ।। ३३९॥ जे सुख सेवोनि म्हणती सुखी । ते वृत्ति विरे सुखोदकीं । तें सौख्यांत हे विवेकी । ब्रह्मनिष्ठ बोलिजे ।। १० ।। त्या निराकुला नाही अवधी । जैसा कल्पांती उदधी । अंत पहातां वेदी । " नेति' म्हणोनि परतती जे ॥ ११ ॥ अथवा माया वर्णातीत । सर्वअवस्थेव्यतिरिक्त । की निराकुल म्हणिजेत । तया रहित परमात्मा ।। ४२ ॥ ज्ञाने चिन्मात्रैक स्फुरण । तद्रहित में निजभाव शून्य । ते ज्ञानांतर सुविज्ञ । दैवागळे सेविती ।। ४३ ।। सेवन म्हणिजे ऐशी युक्ती । " सोहमस्मि" या वृत्ती । परमात्म्याचिया स्वरूप होती । कीटकी भृकुटीचे न्याये ।। ४४ ॥ की नाना पंथीं एक स्थान । नाना उद्योग एक धन । साधिजे तैसे स्वरूप जाण । वाखाणिले बहु शब्दी ।। १५ ।। एवं विशेषणी बहुती । आत्माचि प्रतिपादिला ग्रंथी । जैसी सोयरिकेची नातीं । पुरुषनामें भिन्नभिन्न ॥ ४६ ॥ तया अनुपम आत्मकनका । न पडे वाचकाची टीका । तरी बोलिने जैसे अर्का । चित्रामाजी रेखिजे ॥ ४७|| मुक्याने वोते अमृतपान । वृक्षमुळीने सेविले जीवन । ते न सांगतां अमरपण | सपल्लवे जग जाणे ॥ ४८ ।। तेंवि अनुभवाची खूण | अनुभवी जाणती विच. क्षण | बोधितां न बोधिती अज्ञान । ते पाषाण नरदेही ॥४९॥ येवूनियां नर. देहा । येणे ज्ञाने देहसंदेहा | न खंडितीते भवडोहा । मानी पडले चिर काळ ।। ५८ ।। एके मरणे न खंडे मरण । म्हणोनि मृतांतर हे वचन । सर्वदा प्रेतप्राय जाण । ज्ञानजीवन त्या नाहीं ॥ ५१ ।। आत्मज्ञान जाले जया । पंडित ऐसे ह्मणती तया । जे न भुलती लोभविषया । स्त्रीसंगादी कल्मषी ॥ २२ ॥ स्त्री देह चर्माची कोथळी । भरली नरकपयकमीजाळी । अधोद्वारी सदाकाळी । अघोवात उघडले ।। ५३ ॥ जैसी पायखोळणी मोहरी । भरणाश्रय आमध्यनीरी । तैसा द्रव योनिद्वारी । म्हणोनि सदा अशौच ।। ५४ ॥ अस्थिर म्हणजे न लागतां क्षण । तंव पालटे नव तारुण्य । जरेने देतां आलिंगन । होय जर्जर मर्कटी ।। ५५ ।। चर्मपात्र द्विधा भिन्न | अपानोबारे जडले जाण । त्या लागी उचिती धन । ते मूढ जन संसारीं ।। ५६ ॥ विष्टा मूत्राचे भाजन । जाणोनि रमेना ज्याचे मन । ते पंडित विचक्षण । मोक्षसदनी ठाकती ।। ५७ ॥ स्त्रीच्या देहीं दोषदृष्टी । देखिजे जैसे विवेकनिष्ठी । तैसेच आत्मदेहा निकटीं । विचारवंते पाहिजे ॥ ५८ ।। नरदेहींचे तारुण्य प्रबळ । तरंगभंगाहूनी चंचळ । होवोनी नासती चपळ जळ । तैं चंचळ धनलक्ष्मी ।। ५९ ॥ तृणाग्नि पडतां जळबिंदु । पडतां न लगे क्षण पादु । तैसा स्त्रीसंगाचा आनंदु । रेतपाती लवमात्र ॥६॥ २२ दिवस-सूर्य. २३ अवधी-मर्यादा. २४ नेति=न + इति=नाही असे. २५ सोहमस्मि तो मी आहे (सः अहं अस्मि).२६ सूर्य. २७ कोथळो-पिशवी.