पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रंभाशुक-संवाद-(ओंब्या.) (१३५) विस्तारी विषयसुख । अनुवाद करितो नावेक । ओतेजनी परिसावा ॥ २९४ ।। सखोल नाभी अतिगंभीर । जैसे लावण्यसरोवर । वरी त्रिवली सुंदर । श्यामोदकी सुरसरिता ।। ९५ ॥ जैसें हिमालयाचे युगुल | तैसें स्तनद्वय वर्तुळ । उंच गौर सुशीतळ । स्पर्शतां निववीत संतप्ता ।। ९६ ।। तया कुचयुग्मांतरी । रम्य रमणीय पाठारी । तपे तपती निरंतरी । मने आसक्त पुरुषांची ।। ९७॥ जैसे कर्पूरकर्दळीचे स्तंभ । तैसें जानुद्वय स्वयंभ । चीर उकलितां सुप्रभ । गौरपणे भुलवी जे ॥ ९८ ॥ कटिमंडित कटिमंडळा । तें तेज दावी नाभीतळा । तया अंतरीं गुह्यस्थळा । दैवा आगळा तो देखे ।। ९९ ॥ अधरे न चुंबिती अधरा । करे न शिवती पयोधरा । गुप्त नलिनीमंदिरा । रेतपाटा न लाविती ।। ३०० ॥ स्त्रीमुख न चुंबिती वोठे । ते भग्न भाजनाचे कांठ । कुच न मर्दिती कर थोटे । मोडियेले येरवी च ॥ १ ॥ लेाहाती दिधले शस्त्र | काय पुरुषार्थ करील थोर । तैसें त्याचं कामागार । निर्व्यापार लडबडी ॥ २ ॥ ऐसे रंभेचे वोखटे । शब्द ऐकतां मन विटे । कर्णरंधी घालयोन बोटें । अधोवदनीं निश्चळ ॥ ३ ॥ मग विचारूनी प्रत्युत्तर । देता झाला चतुरेश्वर । जेणे शृंगाररससागर । दिसे मृगजळासारिखा ।। ४ ।। ज्ञानवैराग्यनिरूपण | मग बोलिला विचक्षण । त्याहानि विस्तार गहन । निज ज्ञान प्रगटिले ।। ५ ।। बुद्धि बोधा होय मिळणी । चित्त चैतन्या बुजावणी | अहंता सोहंपणी | मन उन्मनी तल्लीन ॥ ६ ॥ या उभयांचा संयोग। तया नांय मणिजे योग । ते संसारी सुखसंभोग । ते योगांतर जाणिजे ॥ ७ ॥ की तत्पद ऐसे बोलिजे शिवा । त्वंपद नाम ऐसें जीवा | दोघे येती ऐक्यभावा । ते असि पद बोलिजे ॥ ८ ॥ दोघांचिये मिळती संधी । लाधे महत्त्वानंदसमाधी । तेचि योगांत बुद्धी | आत्मविदां मानली ॥ ९॥ ते ही कळा करूं उघडी । उकलूं गुह्याची घडी । गुण ग्राहिक जोडी । जो जे स्वरूप ऐकतां ॥ १० ॥ ऐका तत्पद तो ईश्वर । तो जाणावा द्विप्रकार | माया शबळ ब्रह्मविकार । हा वाच्यार्य तिहींचा ।। ११ ।। माया विनिर्मुक्त निष्कंप । सत्यज्ञानानंतस्वरूप । तोचि लक्ष्यार्थ निर्लेप । परमात्म्याचा जाणिजे ।। १२ ।। त्वंपद तो जीव सहजें । तो ही द्विधा आणिजे । वाचोनि लक्ष हे बोलिजे । उभय अंश तयाचे ।। १३ ॥ देह द्विधा विनिर्मुक्त । प्रत्यक् चैतन्य निर्धूत । तो चि बोलिने लक्ष्यार्य । जीवात्म्याचा निर्धारें ॥ १४ ।। जीवेश्वराचे लक्षांश दोनी । निवडोनि करावी मेळणी । नैसे गंगायमुनेचे पाणी । ऐक्यवादें समरसे ।। १५ । प्रतिबिंब निजबिंबाते पाहे । तंव विंबत्व अंगी लाहे | दर्पणी गिळले तरी आहे | प्रतिमुख निज मुखीं ॥१६।। महदाकाश घटाकाश । मेळविले हे बोली वोस । लहरी आणि क्षीराब्धीस । वेग १६ लेप-चित्र