पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रंभाशुक-संवाद-(ओव्या.) (१३१) चनाचे ठायीं । सौख्य न भोगी कांहीं । जो जितेंद्रिय जैसा अही । वायु भक्षी चनस्थ ।। २१० ॥ धिग धिग त्याचे जाले । घिग धिग त्याचे अभ्यासिले । जळो तयाचे तप जे फळलें । देहदंडण दुःखेसी ॥ ११ ॥ तृणाचा कृत्रिमपुरुष। क्षेत्रीं उभा रक्षीत पीक | त्या साच मानिती नंबुक । परि नव्हे सजीव निधारें ।। १२ ।। तेंवि तयाचा वृथा देहो । प्रेत ही नव्हे पा वाहो । जो कांतासंगी नेघे लाहो । विषयभोग सुखाचा ।। १३ ।। ऐसी रंभा बोललिया वरी । शुक आश्चर्यहास्य करी । म्हणे कैसी भ्रमचक्रीं । पडिली असे अविद्या ॥१४॥ बोले तितुके विपरीत । जैसे वोडंबरीचे वित्त । विषा नाम ठेवूनि अमृत । सेवा म्हणे पुढिलांतें ॥ १५ ॥ की मैंदाचे साजणें । की पारिधीयाचे अळवणे । किंवा कंठभूषणा. अर्पणे । उचित काळसर्पातें ॥ १६ ॥ तैसी रंभेची वचनोक्ती । जे साच मानिती चित्ती । ते प्रत्यक्ष आत्मघाती । नाहीं यदर्थी संदेहो ॥ १७ ॥ वागनिश्चय नरकाचा । इही उत्तरी होय साचा । जीही मनाते पोकळ पांचां । विषयां हाती दीधलें ॥ १८॥ मोक्षरवीच्या दर्शनदृष्टी । जिहीं फोडिली आपुली विचारदृष्टी । जे साच मानोनि गोष्टी । हांव धरती भोगार्थ ॥ १९ ॥ ऐसा निश्चयी श्रीशक । बोलता झाला निजविवेक । जेणे विषय कामनाप । शोषोनि जाय श्रोत्यांचा ॥ २० ॥रंभे ऐक यथार्थ बोला । तो येक जित ची मेला । जो नरदेह पावोनि वहिलां । आत्मसाधन न करी ची ॥ २१ ॥ ते कैसे लक्षण म्हणसी । ऐक सांगेन तुजपाशीं । नित्यानित्यविवेक ज्यासी । नेणवेची अज्ञाने ॥ २२ ॥ इंद्रिये करूनी माजोर । राख्न विषयमषकद्वारें । उघडा विषयी अविचारे । तोड शुची वारिता ।। २३ ।। क्षमा संतोष विवेक । चौथा साधुसंग दिख । हे मोक्षद्वारीचे निष्टक । द्वारपाळ अर्जिले ॥ २४ ॥ त्यांशी वोळखी झालिया । माजि प्रवेश होय तया । त्यांतें नोळखे जो प्राणिया । तो भंवगर्ने लोटिजे ॥ २५ ॥ म्हणोनि तो चि ये संसारीं । ज्ञानहीन प्रेतशरीरी । अमंगळविषये वेष्टिले वरी। तनु पाळी शंकरन्यायें ।। २६ ।। धिगधिग तयाचे शरीर । धिगधिग तयाचे ऐश्वर्य थोर । जळो तयाचें राजमंदिर । आत्मविचार जेथे नाहीं ॥ २७॥ धिगधिग तयाचे शाब्दिक ज्ञान । धिगधिग तयाचें दांभिक भजन । धिगधिग त्याचे तामस मन । स्फितीचे श्वान जे होती ।। २८ ॥ आत्मसाधनी सावध । वथा न दवडिती निमिषाधे । याती पवित्र शुद्ध । तयाचेनी त्रैलोक्यों ॥ २९ ॥ ते होत अवमानिले सधनी । ते होत निंदिले दुर्जनी । ते होत सांडिले स्त्रीजनी । विषयीं न जोडे ह्मणवो ८६ कृत्रिम पुरुष बुजगावणे, बाहुलें. ८७ जंबुक-कोल्हा. ८८ पक-चिखल गर्ता खाडा. ९० शूकर-डुकर..