पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रंभाशुक-संवाद-(ओव्या.) (१२९) ऐसे बोलिला शुक वरिष्ट । जैसा अमृतनदीचा पाट । रंभा विषलता कडुवट । सेवितां नये मधुरते ।। १६७ ।। परिस लाविला खापरी । कैसेन ये सुवर्णसरी । वेत वाढला मलयगिरी । कैसेन ये चंदनत्व ।। ६८ ॥ इक्षदंड रसाचे निरी७७॥ लावियल्या विषवल्लरी | पालट नव्हे तैसी परी । पाखंडीया सत्संगें ।। ६९॥ अमान्य करोनी शुकवचना । रंभा म्हणे ऐक ब्राह्मणा । शृंगारशास्त्री न होवोनि शाहाणा । वंचलासी सुखाते ।। ७० ॥ विषयेद्रियां घालोनी जोडी । नेणसी शरीरसुखाची गोडी । स्त्रीसंगाची अर्ध घडी। क्लेश नाशी जन्माचे ।। ७१ ।। प्रत्यक्ष विषयसुखाचे कनक । सांडी ते क्षणी नाडिले मूर्ख | मोक्षदेहे नाशाची राख । मागती भीक ती लागी ।। ७२ ॥ भरली अमृताची कनकवाटी। हातीची सांडोनि करंटीं । धांवती मृगजळापाठी । तैसी गोष्टी वैराग्या ।। ७३ ।। एक विषय इंद्रियां परवे । ते सुख सर्वेद्रिये भोगावें । सद्रिय भोगासवें । ते सुख देवें सभाग्या ।। ७४ ।। आधीच नरदेह अनर्घ्य रत्न । विशेष तारुण्य परिसाचे गुणे । जोडले बहुत सुकृते करुन । परि परीक्षकहीना सांपडले ।। ७५ ॥ अजारक्षक अविचारा । हाती पडलिया हिरा । तेणे रक्षावया तपोक्षेत्रा । यमनियमी गोफणिलें ।। ७६ ।। आयुष्याचिये तातडी । तारुण्यदेशाच्या सुरवाडी | भोगभोगी चढोवडी | धन्य तो एक दैवाचा ।। ७७ ॥ वसंतमासी मनोहर । वना पातला कुसुमाकर । पुष्पजाती देती संभार । उचित नाना सुमनांचे ।। ७८ ॥ जाईजुई राजसेवती । मंदार वाटीगर मालती । चंपक पाटला पारिजाती । वाट पाहती परिमळे ।। ७९ ॥ तैशी पुवती प्रमदा । देखोनि वल्लभ चढे अत्यानंदा। मग संघटे सुरतयुद्धा । तैसें भ्रमरा होतसे ॥10॥ उमाधवाचे पूजे । वना माधवें केले बिजे ।। पुष्पांजळी वोपितां सहजे। वनस्पती भूलिंगी ।। ८१ ॥ नारिंगी आणि क्षार बोरी । साखरनिंबोणी रसभरी । फळे दावोनी अंतरीं । आठव देती स्तनांचे ।। ८२ ।। आम्र फळे बिल्वफळे । काठन वर्तुळ ताळ कोळे । स्त्रीस्तना निहीं त्यजिले । हे आठवोनी पडताती ॥८३ ॥ जी तारुण्य दशेचे कौतुके । वर्जिली कुचालिंगनसुखें । त्यांच्या हृदयींची स्मनि दुःखें । पक्क दा. ळिंबें उकलली ॥ ८४ ॥ तेथे रमणीय सरोवरें । आच्छादिली पद्मिणीपत्रे । कामिनी अधरामृत अधरें । जेवि लोपले जन दृष्टी ॥८५ ।। भ्रमराचिये श्रुतीवरी। कोकिला गाती रागोद्वारी | मृदंगशब्दे जळर्लहरी । तीरी आंदोळती सुताळ ॥ ८६ ।। तया ताळावरी स्वानंदें । मयूर नाचती आनंदें । हे देखोनि हृदय विधे। पुष्पधन्वा निजकरी ।। ८७ ॥ मंडप 'शाइले केतकीतळी । स्तंभी लाविल्या कर्पूर ७७ नीर-पाणी. ७८ पुष्पवती रजस्वला. ७९ धव-नवरा. ८०.लहरी--पाण्याला लाटा.८१ पुष्पधन्वा मदन.