पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुक्तेश्वरकृत. रंभाशुक-संवाद. (ओंव्या) तुज कामाक्षीचेनि वरें । कामना जाणीव अंगों भरे । मग अविकार विकारी अवतरे । इंद्रियासनी भोगार्थ ।। १ ।। सुरतासनाचिये हे डाक । पराच्या पायीं अडकतां देख । घुमो लागे अधिकाधिक | लोळती लोक तिजपायीं ।। २ ।। ह्मणोनि त्रैलोक्यवेधके । त्रैलोक्यक्षोभकारके । तपसोमेकांतउदके । मुखैदुकिरणी करिताति ॥ ३ ॥ ऐशिया अमृतोपम वचनी । रंभा गौरवी बज्रपाणी । सखियां सहित अप्सरगणीं । तेणे येरी संतुष्ट ॥ ४ ॥ शक्रवाक्येंदुरश्मिस्पर्श । रंभावदनकुर्मुद विकासे । हस्त जोडणीयाचेनि मिसें । संकोचलीं करझें ॥ ५॥ विनय च!नि शरीरी | रंभा वचन वाटोगारी | सरेंद्रश्रोत्रलिंगावरी । पूजा बांधी संभ्रमे ।। ६ ।। ह्मणे आज्ञा देई सुरनाथा । कवणा विघ्न करूं आतां । स्वर्गा येतो त्यांच्या पंथा । मार्गार्गळा होऊनि राहं ॥ ७॥ घालं नेमिष्ठावरी धाडी । पाडूं योगियांच्या मुरकुंडी । तपश्चर्येची पोतडी । हिरोनि आणं या ठायां ।। ८॥ माझ्या देहाचे वोढण । आड असतां तुह्मां विघ्न । स्वप्ती ही परि नाही जाण । दुश्चित्त मन कां करिसी ।। १।। ऐकोनी रंभेच्या वचना । हर्ष न संटे शकमना । आज्ञा देऊनी सुरांगना । शुकाश्रमी पाठविली ॥ १० ॥ ह्मणे वेगी जाय सभद्रे । मदनांगेने सम सुंदरे । मदनमेखले मनोहरे ! जेथे वसे तो तपी ।। ११ ।। तया शका क्षोभवी बळें । तपा विघ्न करीं वहिले । समाधि भंगोनी कामकळे । भुलचोनि करी आपसा ।। १२ । नेसा निरपेक्ष अयाचित । तो ही द्रव्यार्थे होय, भ्रमित । तत्वनिष्ठा विवेकवंत । गुरुत्वमाने नाचवी ।। १३ ।। तयापरी व्यासतनया । मोहोनि आणी इया ठाया। जैसे पर्वी उर्वसीया । विश्वामित्रा लागोनी ॥ १४ ।। ऐशी शचीवराची वचने । रंभेने केली कर्णभूषणे | मग शुकविग्रहा उत्साह मनें। निघती झाली तात्काळ ।। १५ ।। आरूढली दिव्य विमानी । तेजे लोपले द्वादश तैरणी । रत्नमाळा घंटा किंकिणी । वरी ढळती चामरे ॥ १६ ॥ उपमेरहित पुष्पकी शोभा । शिखरे गोपुरे ध्वजस्तंभा । पताका झळकती त्या प्रभा । विद्युलता लज्जित ।। १७ ।। पैज बोलोनी शुभानना । बाळा प्रौढा मुग्धांगना । प्रतापे चालिल्या ऋषिकानना । नाना कन्या समवेत ॥ १८ ॥ हस्तिनी चित्रिणी पद्मिनी । चांपेगोरटिया शंखिणी । षोडशवर्षा सुरतासनी । कुशल कळा जाण १. कामाक्षी देवी. २ सोमकांत चंद्रकांत. ३ इंदु-चंद्र. वजपाणी इंद्र. ५ रश्मि किरण. ६ कुमद-चंद्रबिकासी कमल. ७ पद्म-सूर्यविकासी कमल. ८ अर्गला अटकाव. ९ मदनांगना=रति. १० मेखला कमरपट्टा. ११ शचीवर-इंद्र. १२ तरणी-सर्यः १३ पुष्पक विमान.