पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२०) उद्धवचिद्घनकृत भगवदगीता. मोळतसा विरतो अति अद्भुत कांपत सात्विक भाव अशाने ।। ७४ ॥ आणि म्हणे गुरु धन्य कृपानिधि उद्धरिले मज ध्यासमुनींद्रा ।। जो परयोग सदाशिव ध्येय स्वये वदला हरि गुम समुद्रा ।। स्थापनियां जग मार्ग-प्रकाशक वेद करी श्रमला सुखनिद्रा ।। ते मन देसिल पायदळे फळले सुख लोचन लावुनि मुद्रा ।। ७५ ।। बोलत हे कुरु-वंश शिखामणि आठवितां पुढती पुढती हा ॥ केशव अर्जुन एक परस्पर बोलियला वचनोदधि पाहा ॥ अद्भुत त्या स्वसुखा पहतां मन हारपले सह इंद्रिय दाहा ।। आणि घडीघडि हृद्गत दाटतं हर्ष करी विसरा निजदेहा ।। ७६ ॥ हे महरान मला बहु विस्मय आठवितां हरि-विश्वरुपाते ।। अद्धत ते निविंचे न वचे परिच्या वरि दाटत सात्विक चित्तें ॥ येरु मनी म्हणतो न पुसों तुज येश अपेश घडे कवणातें ।। नाणनि हृद्त ते काय संजय आठवुनी बरवे भविष्याते ७७ ॥ श्रीपति योगपती कमलापति नेथ कृपा करि आत्मसुखाने । पार्थ धनुधरि ते चि कृपामृत प्राशुनि घालित तेय चि ठाणे ॥ नथ श्रिया विनया सह नांदत व्यासपे मन निश्चित बाणे ।। उद्धवचिघन स्वानुभवें सुख्न पावत लेवुनि अद्वय-लेणे ॥ ७८॥ उद्धवचिघनाने केलेले गीतेचे भाषांतर समाप्त.