पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवनाथकृत. तपी याचे हे वचन खरे कीजे । राजयाते सायुज्यपदा दीजे ॥ अंतकाळी मग स्मरे जो सुवाचा । मुक्तरूपी देह की जाण साचा ॥४४॥ अशा योगे त्यागिला देह जाणा । तया परमा ती गती प्राप्त जाणा ॥ यया अर्थी प्रभुराज वशिं आला । भक्तवचनाते पाळणे जयांला ॥ ४५ ॥ देवनाथाचा प्रभू दीनबंधू । पूर्ण व्यापक आनंद सांद्रसिंधू ॥ कीर्ते आपुली आपण वर्णिताहे । तया प्रभुचे यश जगी गाजताहे ॥१६॥ |समाप्त ॥ १मोक्षस्थान.