पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रावण आख्यान (९) प्रथम सांगसि तं जार हि वर्तमान । श्राप देतिल ते नव्हे. उदकपान ॥ असे ऐकोनी हृद्रोग तथा जाला । उदक हस्ती तो वृद्ध-निकट आला ॥३०॥ साद येतां बोलती पुत्र-राया । सख्या आलासी वंश उद्धराया ॥ गौरवूनी बहु रिती बोलती ते । परी नेदी उत्तरा राव त्यांते ॥ ३१ ॥ अरे वत्सा तुज कष्ट फार जाले । मुखीं मौन्या कां तुवां साधियेले ॥ नरी बोलसि तूं आमुशी सुवाचा । तरी प्राणू जीवना मान साचा ॥ ३२ ॥ ह्या चि निर्धारा जाण सत्य साच्या । आण वाहूं संकल्प हा जिवाचा ॥ निश्चयाते ऐकुनी राव बोले । होय दशरथ मी उदक आणियेले ॥ ३३ ॥ वृद्ध ह्मणती पुत्र तो कुठे गेला । राव बोले मम हस्तकी निमाला ॥ पुत्र-मृत्यूचा शब्द पडे कानीं । पडति धरणीसी हाय शद्ववाणी ॥ ३४ ॥ आंग टाकुनि लोळती दीनवाणी । गुणां स्मरुनी ते वदति दीन वाणी ॥ धन्य पुत्रा बा स्ववंशानुसारा । वनीं मोकलुनी जाति की उदारा ॥ ३५ ॥ कसे रायासी जीवदान केले । आह्मां गहनी त्यजनियां भकेले ॥ अडा माजी अर्धेचि वोढियेले । दोर कापुनियां आंत सोडियेले ॥ ३६॥ रात्रिमाजी उदकासि धाडियेले । म्हणुनि रागें त्वां दूर गमन केले ॥ पुत्र पुत्रा बाहोनी शब्द कारती । तुला कष्टविले आह्मी दिवसराती ॥३७॥ अरे बाळा म्हणवूनि रूसलासी । कसा एकट तूं विष्णुपदा जासी ॥ अह्मां अधांची यष्टि घोर रानी । कुणी चांडाळे घेतली हरोनी ॥ ३८॥ मुखी घालिति ते तदा धूळ साचे । फार कळवळले चित्त ते नपाचे ॥ दे दशरथ त्यां उदकपान कीजे । उभयवौँ मग श्राप तया दीजे ॥३॥ आझि जैसे पुत्रासि आठवोनी । प्राण त्यजितो हदि प्राण साठवोनी ॥ तं हि तैसा पुत्रासि आठवीशीं । वियोगाने तात्काल प्राण देशी ॥४०॥ चिता रचुनीयां देह आर्थं लावी । वदूं * * * * मनी चिंतोनी प्रभुपाय सदा साचे । देह सार्थका लाविले तयांचे ॥११॥ क्रियाकर्मा तेधवां आचरोनी । शापवचना आठवी मनी मानी ॥ मणे मजला संतती नव्हे साची । शकुनगांठी बांधिली आनंदाची ॥४२॥ शाप नोहे हा अनुग्रह चि साचा । धन्य मानितसे दिवस आनंदाचा ॥ फिरे मागे तो वशिष्टासि सांगे । ह्वन मांडी तो नृप हि सानुरागें ॥ ४३ । १ मेला. २ सडना. ३ टाकून. ४ भयंकर.