पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवदगीता-१८. (११५) फार असो त्रिगुणापरते धरणी त्रिदेशालय देव नरा ती ॥ ने घडले प्रकृतीकृत सर्व हि दाखवि घागरि वेगळि माती ।। तंतुस त्यागुनि पट्टरुपानय सांडुनियां जळ बुद्बुद होती ।। सत्वरजस्तम सर्वगुणातित आइक आणिक वर्णविभक्ती ॥१०॥ ब्राह्मण मुख्य धुरे निर्गमोदित त्या चि परी अधिकारि हि क्षत्री ।। सत्व-गुणी रज सत्व मिळे तरि वैश्य तिजे भरले श्रुति-शास्त्री ।। वर्ण तिन्हीहनि तामस राजस शूद्र चतुर्य हि होउनि सूत्री ॥ वर्ण विभागुनि कर्म स्वभाविक आइक अर्जुन सावध "श्रोत्री ॥ ४१ ।। बुद्धिस आत्मरुपी स्थिरणे शम इंद्रिय तेथ दमी दमने ।। सात्विक सांगितले तप ते शुचि निर्मळ शांति उणे सहणे ।। आर्जव सर्व भुती सम ईश्वर निश्चय ज्ञान तया म्हणणे ॥ जाणिव ग्रासुनियां उरणे बुझ ब्राह्मण या परि कर्मगुणें ॥ ४२ ॥ एकपणे सुरसिद्ध जसा हरि प्राङ्मुख रात्रि जसी रवि-तेजे ॥ धैर्य जसा कनकाचळ दक्ष समस्त हि जाणुनि जाण उरीजे ।। युद्धि उभा तुकडे जहले गण प्राण अवश्य शरीर चि झुंजे ।। दान अवंचक ईश्वर भाव हि सत्य गुणी असे शोभति राजे ।। ४३ ॥ नागर बीज पशू मुदले करि शेतकि पाळन गाइखिलारे ॥ घेउनियां संवैगे विकती बहु वस्तुस माहग वैश्य-क्रिया रे ॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तिघां श्रुति सूत्र निजाश्रय दुर्धर वारे । सेवक शद्र तिघां सजिला करि चाकरि आवडिने अधिकारें ॥१४॥ सांगितले तुज कर्म स्वभाविक ते करिती निज वर्ण-विभागें ।। सत्वगुणे प्रितिपूर्वक आचरतां नर निश्चित मोक्ष चि भोगे । जे अपुले अपणासि च ठाउक शास्त्रदिप करि आणिक नेघे ।। स्वात्म-क्रिया-रत पावत सिद्धिस ज्यापरि आइक ते तुज सांगे ।। ४५॥ नेयुनि भूतसमूह प्रवर्तति जे न गुणी सह जे निज कर्मी || १५ त्रिदशालय-देवाचें घर (स्वर्ग). १६. नर=अर्जुनाचें नांव. १७ वर्णविभक्ती अक्षररचना (शब्द) १८ निगमोदित वेदाने सांगितलेला. १९ श्रुति वेद. २० वर्ण= रंग, जात. २१ श्रोत्र कान ("त्र प्रत्यय साधन दाखवितो जसें वक्त्र-बोलण्याचे साधन, नेत्रवाट दाखविण्याचे साधन, पात्र पिण्याचे साधन खनित्र-खणण्याचे साधन इ. ) २२. आर्जव सरळपणा (ऋजु सरळ (मराठी) उजू ). २३ काकाचळ सोन्याचा पर्वत, मेरु, २१ अवंचकन फसविणारा. २५ संवर्ग-थोड्या किमयाज मिळणारे, २६ मोक्ष सुटका.