पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-१८. (११३) आणि अकारण व्यर्थ अडंबर कष्ट जिवाप्रति देति अशेषे ।। नेणतसे करणे त्यजणे अविवेक उचाटन मारण ऐसे ।। कर्म घडे रूप तामस जाणसि त्याग-मिषे कथिजे हषिकेशे ।। २५ ।। जो अपणे अपणास चि जाणत मुक्तपणे फळ होउनि आंगे ।। शुद्ध क्रिया निगमोदित वेचित जो हरिखे आधिकाधिक योगें ।। सिद्ध असिद्ध कदाचित हो परि हा अविकारपणासि न भंगे ।। वर्ततसे निरहंकृति सात्विक आचरता तुज लागुनि सांगे ।। २६ ।। कर्म-फळाप्रति इच्छनि आवडि लब्ध धनी बक मत्स्य गिळाया ।। स्वार्यमुळे शिणवी भलत्यास हि जो न विचारित आप परा या ।। बाहिर आंत सदा अशची घडितो शत शे घडि शोक कराया । वेळ नसे बुझ राजस हा करिता मज वाटत भारत-राया ॥ २७ ॥ जन्मत अंध तया रविचे परि त्यक्त अनोळख प्रेम शरीरा ।। नित्य सचित्त उगा फुगला कपटें जन मोदितसे अपहारा ।। नाठउनी गुण दोष चि पाहत शुद्ध किये अळसी धन दारा ।। प्राप्तिस प्रेन बहू मनि क्रोध बझें नर तामस अर्जुन वीरा ।। २८ ।। त्याचि परी धृति बुद्धि गुणी तिहिं भेद विभागुनि देउ किरीटी ।। आइक ते अवघी पृयकाकृति विस्तरिजेत सख्या तुज साठी ।। सांडुनि राजस सात्विक ग्राहिक तामस हो श्रवणे जगजेठी ।। त्यातिल बुद्धि च ते पहिली कसि श्रीमधुसूदन दाखवि ओठी ॥२९॥ शास्त्रदिठी गुरुसंत मुखे निज मोक्ष वरी म्हणिजेत निवृत्ति ।। शिष्ट रिती जनि वर्ततसे करणीय क्रिया बहु तेय प्रवृत्ति ।। कार्य अकार्य बरे निवडी भय निर्भय बंध विमोचन शांति ।। जे सकळी करु-नंदन बुद्धि ते सात्विक शोभत माळ महंती॥ ३०॥ जे निज धर्म अधर्म न नीवार्ड कार्य अकार्य विचार करीना ।। सेव्य असेव्य अनोळख त्यांत हि भोगविशी अनुताप धरीना ।। होईल लोक किं स्वर्ग अपेक्षित काय करी इतुके हि कळेना ।। ते बुझ राजसि बाद्ध धनंजय मिश्र क्रिया उपजे जिस नाना ।। ३१ ।। वाटतसे निज धर्म अधर्म दिवाभित जेवि दिसा करि राती ।। कावळिया दृढ शत्रु सुधाकर दैवहिना धन पायर माती ।। मूढपणे अवघी भरली म्हण सर्व निषेधि च होय प्रवृत्ती ।। काचळ सोन्याचा 2 हरिखे आनंद पावे. ५ किरोटी=अर्जुनाचें नांव. ६ दिवाभोपांस मिळणारे. २६