पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-१७,१८. वेद विधि द्विज वन्हि तिन्ही हबने करि तृप्तिस शुचिर्भुत अन्नी ।। न्यायउपार्जित पात्र विचारुनि वर्षत मेघ तया परि दानी ।। चाङ्कन कायिक सात्विक जे तप आचरणे पण या च विधानी ।। २४ ॥ ते तप दान किं यज्ञक्रिया करितां फळ प्राप्त यथोचित पावे ।। तेथ चि तेवि न योगि न तत्पद ब्रह्मरुपी फळ हे तुस ठावें ।। कर्म समर्पण दोनि हि येक चि भिन्न समर्पक केवि उरावे ।। त्यास्तव हे तिसरे हरि सांगत सावध साधुजनी परिसावें ।। २५ ।। सद्रूप आठवितां करितां चि नरे विनियोगनि कर्मप्रशस्ती ।। साधु असाधु क्रिया घडल्या करि पूर्ण सदा परब्रह्मच वस्ती ।। द्वैत विनाशनि हा सदशब्द असा तमहारक दिव्य गभस्ती ।। त्या परि हे त्रय नाम नव्हे श्रुति धाउनि ढेकर देत समस्ती ।। २६ ।। सांग नव्हे मख की न घडे तप दान यथोचित होउ निवेना ।। तो अवघे परब्रह्म स्वरूपक येक चि ब्रह्म करी जग नाना । अज्ञ अनज्ञ हि सात्विक आवडि आचरतां मुखि या अभिधाना ।। उच्चरितां पद ते चि तुं होसिल अर्जुन या न करी अनुमाना ।। २७ ।। ब्रह्मपदी सुख सात्विक आवडि सांडुनि दान करूं धरणीचें ॥ की हयमेध असे बहु यज्ञ तपे करुं कष्ट तरी हवनींचे ॥ ते अवघी जशि स्वप्निचि संपति व्यर्थ चि शीण तया करणीचे ॥ ना इह लोक परत्र हि कोठुनि हे वदला हरि ध्यान शिवाचे ॥ २८ ॥ सतरावा अध्याय समाप्त. १८ वा अध्याय. यावरि अर्जुन वीनवितो जरि ब्रह्मपदी विनियोगुनि कर्मा । तो सुटला अणि त्यागनि कर्म चि तो हि तुझे पदवी प्रति रामा ।। पाव तया उभया मज संशय ऊपजला परिस द्वय नामा ।।। हे हषिकेश कयों पथके मज न्यास दजा रुप त्याग सवर्मा ॥ १ ॥ श्रीहरि बोलत एक गमे तुज नाणतसे कवणासि च त्यागा ।। भेद असे कथिजेत कसा तरि कामिक कर्म चि टाकुनि दे गा॥ न्यास तया म्हणिजे फळ त्यागुनि नित्य निमित्तक शोधुनि वागा।। त्याग विचःण त्या म्हणती करिती किति आग्रह तो परिसे गा॥ जाणिव घेउनि एक म्हणे अहो कर्म फळास चि केवि ८६ गभस्त पूर्य, ८७ मेध यज्ञ. ८ विचक्षण शहाणे.