पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्वीता-१७. (१०७) नातरि अर्धकची बहु कोरडि सेवित शोषितसे" बहु पाणी।। जेवण राजस रोग समस्त हि नागवुनी करि दु:खित प्राणी ॥ ९॥ जे उतरोनि रसा मुकलें बहु आवडि त्यावरि धांवत भारी ।। अन्न शिळे अपवित्र अमंगळ एक च ताट बह नर नारी ।। खात बहू मुखिंचे उसिटे वरि लाळ गळे चिवडीत चि पोरी ॥ तामस भोजन हे म्हणसी झणि पोट भरी नर पाप अहारी ॥ १० ॥ यज्ञ हि तीन गुणे परि आइक नो पहिला मख सात्विक साचा ।। ब्रम्हसमर्पण याहाने हेतु न इच्छितसे अणुमात्र फळाचा ॥ वद विधी युप मंडप कुंड विचारुनि दीक्षित संग द्विजाचा ॥ च्यारि च्यॉरि द्वय पंच पुन्हा द्वय घोष उठे शुभ सत्व क्रतूची ।। ११॥ राजस याग दिसे बरवा परि स्वर्गसखावरि आवधि ठेवी ॥ दंभ अहंकृति मान्यपणे जगिं दीक्षित मी अशि कीर्ति हि व्हावा ।। श्राद्धमिषे नृप आंवतिला तरि श्राद्ध घडे यजमान हि जेवी ।। या परि हे भरत प्रभु जाण धना नन मान पर हि भावी ॥ १२॥ स्वप्नि हि ठाउक वेद नसे मग तेय विधी मन मानित तैसी ।। इतक वस्तु निवाड न जाणत भक्षविर्षी जन ग्राहक मांसी ।। मंत्रपिसे भलते च वदे वरि दक्षिण नांव न दे उदकासी ॥ यज्ञ करी फग पर्वत गर्व चढे नतरे तम जाण मखासी ॥ १३ ॥ आइक हे तप ही त्रिगुणात्मक त्यांत तपा रूप वाङ्मन काया ।। त्यांत हि कायिक देव द्विजा गुरु संत पुजी शुचि पांडवराया । आर्जव सर्व भुतां प्रिय अद्वय भेद न जाणत स्त्रीपुरुषां या।। यास्तव कामिनि काम नुठे तृण ही परि चित्त नव्हे दुखवाया । १४ ।। बोलतसे वचना परमार्थ चि साधक सर्व जना उपकारी ।। सत्य जसे परमामृतसे प्रिय मंजुळ घेइल त्यास न वारी ।। नातरि वेदस्मतीपठने अथवा हरि अच्युत कृष्ण मुरारी ।। बोलत डोलत वाङ्मय हे तप सांगतसे मधुकैटभरी ।। १५ ।। मानस निर्मळ चंचळ तेंवि न पूर्ण शशी च अलांर्छन जैसा ।। आत्मसुखें मम तत्व विरे तरि मौन घडे मन निग्रह ऐसा ॥ मीठ पडे तरि सिंधुनळी मग सिंधुमिठास अभाव अपैसा ।। ७१ शोषितते-पीत असे. ७२ मख-यज्ञ. ७३ यूप-खांब. ७ ४ कुंड-भांडें. ७५ सावन यज्ञ. ७६ परत्रपरलोकी. ७. पिसे वेड. ७८ मधु-हें एक राक्षसाचे सोन्याचा ७८. टीप पहा ८० लांछन डाग. पास मिळणारे. २६