पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-१६,१७. (१०५) भूक बहू मुख लाहन इंद्रिय एकचि भक्षण नर्क-निदानी ।। दुःख-पुरी बुडवीत असे काधं नायकती श्रवणी सुख वाणी ।। १९ ॥ कल्पवरी मरती पुढती पुढती धरती मुढ आसुर देहो ॥ तेथुनियां नउ मासभरी सुख घोर तमांत चि टाकुनि दे हो । कंति-सुता मन नेणति आधम ते अधमा गति त्यांस सदा हो । सांगतसे तुज एक करी मानं गोष्टिस या चुकसील कदा हो । २० ।। शत्रु जगा तिन राक्षस हे बळि भक्षुनियां उरले तिन्हि लोकां ।। काम पुढे तंव पाठिसि क्रोध हि लोभ तयावरि देत अवांका ।। दारवठा उघडा नरकाप्रति हे तिघे प्राणि-गणा अवलोका ॥ यांस त्यजी त्यनिती द्विज अंत्यज यापरि अर्जन काहिं न धोका ।। २१॥ ही तिन बंधने तोडुनि जो नर सांडिल निश्चित द्वार तमाचे ।। सद्गुरु-सेवन शास्त्रविचारण आचरणे शुभ आत्म-सुखाचे ।। कृष्ण हरी मधुसूदन माधव अंच्यत चिदघन वर्णित वाचे ।। संस्मरणे चुकले भ्रम पूर्वक उत्तम ते रुप नीज गतीचे ।। २२ ॥ हे सख सांडनि कामविशी काध मानि च ना गरु सज्जन वेदा ।। भोगिन मी इह स्वर्ग म्हणे अवघा करितो अभिच्यारिक धंदा । त्यास नव्हे कधिं सिद्धि हि बुद्धि हि दुःख चि ये गवसी मतिमंदा ।। नेणति ते परमागति मागति होउनि राहति भाजन खेदा ॥ २३ ॥ शास्त्र पुढे दिप सोज्वळ लावुनि कृत्य अकृत्य बरे कळवावे ।। टाकविले तर राज्य हि टाकान घेवविले विष तत्पर घ्यावे ।। या विधिने जरि वर्तसि अर्जुन कर्म न लिपसि मुक्त स्वभावे ।। आइकतां मग उद्धवचिद्घन संत जना विनती करि भावे ।। २४॥ साळावा अध्याय समाप्त. अध्याय १७ वा. पार्थ ह्मणे हरि शास्त्र विचारुनि आचरणे गति उत्तम होती ।। तो विधि अश्रुत ज्यांस न शास्त्र हि ठाऊक आवडिने यजिताती ।। सत्वरजस्तम हा गुणभेद तयांतहि काय कसा गुरुमूर्ती ।। निश्चित पावति ते कथिल्या गति जाइल सर्व हि मानस भ्रांती॥ १ ॥ देव म्हणे परिसे गुण मायिक तीन तयांत हि जन्मति देही ।। ६. कल्प= चार अज बत्तोस कोटि वर्षे. ६१ पुढती पुढती पुनःपाप-सोन्याचा विचार करून. भात मिळणारे. २६