पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-१५. (१०१) होउनियां घट आणि मठादिक भंगित त्यापरि यो मनभंग ॥ १० ॥ नेमुनि आत्मविशी अपणास च लक्षित राहुनि आत्मस्वरूपी ।। निग्रह त्या करणे करणे सहजे घडले मुळ द्वैत प्रलोपी ।। हे न घडे तरि स्वर मना विषयानळिं तापवितो त्रय तापी ।। तो मज पाहें चि ना चि तयास अनोळख अंधसमीप च दीपी ॥१२॥ जे रविच्या उदये सगळे जग दावितसे स्थुळ सूक्ष्म विलोकी ।। जे शशिच्या उदये निववी बहु धान्य वनस्पति जीवन पोखी । में अनळे करि दाहन पाचन सिद्धिस हे उघडे अवलोकीं ।।। ते अवघे दृढनिश्चयपूर्वक जाण खरे मम तेज बरें की ॥ १२ ॥ आणि धरा धरणीधर होउनि मी धरितों जळ होनें विर ची ।। सर्व भुते वरि उत्पति लोपति धारक मेदिनि जाण तयाची ॥ सोमरुपे रस पूरवितो करिं वृद्धि मि होउनि नाति रसाची ।। खारट आंबट तीखट तूरट होउनि मी रसना चवि साची ।। २३ ।। ते चि मि अन्न चतुर्विध प्राणिघटी पचवीं जठरानळ होतो ।। रेचनि' प्राण अपान दिवानिशि भस्म सुखें अति दीप्ति करीतो ।। तोच सुधारुप काळ जना क्षण पाळुनियां प्रळयास हि नेतो ।। यास्तव भूक मि अन्न मि तृप्ति मि आत्मरुपे सकळांत रहातो ।। १४ ।। तो कवणेपरि हे पुससी तरि सर्वभुती रूप मी हृदयाचे ।। सर्व निविष्टुनि मी च वसे स्मृति ज्ञान अंजाणिव ही मि च साचें ।। सर्व हि वेद मि होउनि वानितसे महिमान स्वयें स्वरुपाचें ॥ वेद सरे मज पाहुनि तेहि मि मी निज वैद्य हि वेदविदांचे ॥१५॥ आणिक येक रिती तुज सांगत वोळखसी मज आत्मरुपासी ।। दोपुरुषी इह लोक समस्त हि जैवि अहिनिशि सर्व अकाशी ।। तो क्षर येक समस्त हि दृश्य पदार्थ अभासत नामरुपासी ।। अज्ञपणा जिव रूप सुषुप्तिस' अक्षर नांव तया पुरुषासी ॥ १६ ॥ आणि तिजा तिन्हि लोक भरी भरला करि पालन ईश्वररूपें ।। जेवि रवी किरणे मृगतोय तिन्ही मुळ येक चि सूर्यस्वरूपें ।। ज्या स्मरिजे परमात्मक नाम खरे पण शिपि नव्हे नगरूपे ॥ - .३२ पोली-पोषो. ३३ होन=होऊन. ३१ मेदिनी पृथ्वो. ३५ चतुर्विध अन्न खादा पेय, चोष्य, लेय. (खाणे, पिणे, चोखणे, व चाटणे) ३६ रेचुनि=रिकामा का अजाणिव अज्ञान. ३८. वेद्य-ज्ञानविषय. ३३ वेदविद-वेदार्थज्ञ. 21 सुषुप्ति-झोंप. १२ अक्षर आविनाशी. पास मिळणारे. २६