पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवदगीता-१५. (९९) तिष्ठतसा दिसतो गुण-संगनि युक्त उदासिनता बिघडेना ।। या परिची खुण जाण गुणातित आचरणे परिसे कर्शि नाना ।। २३ ।। निर्मळ स्वस्वरुपी भरला मग सर्व समान चि बुद्धि तयाची ।। दुःखसुखा रवि रात्रदिसा परि वन्हि-प्रियाप्रिय कांहिं नव्हेची ।। शेण तसे कनका सम मानित रत्नढिगा जशि राशि खड्यांची ।। वस्तुपणे सम तामस निंदक शब्दपणे समता सहजें ची ।। २४ ॥ मानिति की अवमानित दोहिंस आपण नो सहज स्थिति पाहे ॥ मित्र रिपू तरि आत्मस्वरूप चि आधिं च भेद जया सरलाहे ।। जे पडले करणां करणे करितो परि तो फळ-हेतु न वाहे ।। मी-पण-वर्जित तो चि गुणातित आचरणे बरव्या रिति राहे ॥ २५ ॥ सर्व भुती परब्रह्म असे कनकी नगता भुत-भेद दिसेना ।। अर्पण सिंधुजळी अपणा सह सैंधव तेय दुजे उमजेना ॥ अव्यभिच्यारिणि भक्ति असे मज सेवितसे गुण भिन्न करीना || जेवि नदी उदधीस मिळे तरि सागर तें न धरी अणु माना ।। २६ ।। ब्रह्मि मिळे परब्रह्म च तो तरि ब्रह्म असे मजला चि म्हणावे ।। मोक्ष हि मी अज अव्यय शाश्वत शांति-सखादिक ही बहु नांवे ।। एक च तो मि अनेक हि मी मज एक अनेक अनंत स्वभावे ।। वृक्षरु क्षर अक्षर उत्तम सांगिन ते सुजनी परिसावे ।। २७ ।। चतुर्दशोध्यायः समाप्तः अध्याय १५. देवकि गर्भ-सुधांबुधिचा शशि पूर्ण सुधाकर पार्थ-चकोरा ।। क्षेत्र सविस्तर ते चि पुन्हा प्रकृतीरुप ते कथि वृक्ष उभारा ।। ब्रह्म ते ऊर्ध्व अधो डहळ्या जग स्वस्थ न इंद्रिय-ग्रोम-पसारा ।। वाढत मोडतसा दिसतो पण अव्यय वृक्ष तुं नाणसि वीरा ।। १ ।। आणि गुणे बहु वाढति ज्या डहळ्या अध ऊर्ध्व महापसराने ।। नित्य नव्या विषयप्रेबेला घनदाटुनि व्यापति संसृतिराने ।। आणिक ज्या तळिं ही मुळि या अध ऊर्ध्व फळे निज कर्मगतीने ।। मानव-लोक मुळे डहळ्या तरु सिद्ध असा अवघा अभिमाने ।। २ ।। सर्व हि हा जगडंबर वृक्ष दिसे परि यास न रूप न काही ।। - २१ उदधी-समुद्र. २२. सुधाकर अमृताची खाण. २३ ग्राम-प-सोन्याचा कि, अधो-खाली. २५ विषयप्रवाला विषय हा पाला आहे जी मिळणारे, २६