पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-१३,१४. जेवि बहू दिपकांस प्रभा सम की घन-बिंदु-जळे सम होती ।। पाहति ने निज निश्चयपूर्वक ते परमोत्तम प्राप्तिस येती ।। ते नव्हती शरिरी परि उत्तम आत्मपणे अपणांत समाप्ती ॥ २८ ।। सर्व हि जे क्रियमाण चि निर्मित ते प्रकृतीकृत जाणत कर्म ॥ ने मन शुद्धि अहंकृतिपूर्वक भोगविशेषित इंद्रिय धर्म ।। आणि गुणत्रय तीनकडे सहने मग अक्रिय जाण निजात्मा ।। निर्गुण सर्व भुती सम एक चि ते हि बुझे तरि सांगत वर्मा ।। २९ ॥ नेवि नळी नळ-बुद्बुद फार कि हे परमाणु जसे धरणीचे ॥ त्यां रविचे 'कर फार तरी किरणे नग फार जरी कनकाचे ।। तेवि पृथग्विध हा भूतभेद सविस्तर येक चि व्यापक साचें ।। पाहत तद्रुप ते चि घडी बहु भोगित वैभव ब्रह्मश्रियेचें ॥ ३० ॥ हे जड नश्वर होय निमे शरिरात वसे जळबिम्बपरीचा ॥ त्या न करी अणि लिप्त नव्हे रवि तो नभमंडळि आपण साचा ।। अंत न जो अदि पूर्ण अनादि गुणातित अव्यय आत्मरुपाचा ।। तो शरिरा न करी न च लिप्त हि व्यापक चिन्मय राशि सुखाचा ॥३१॥ जेवि नसे अवकाश नभाविण व्यापक सूक्ष्मपणे भरलेसे ।। अंतर बाहिर कोदुनि आपण लिप्त नसे अणु कोठ हि जैसे ।। सर्व हि देहि तयापरि ब्रह्म चि व्यापक लिप्त न तेथ निवासे ।। दीप गृहीं गृहकृत्य न जाणत आत्मरुपा बुझ अर्जन तैसें ।। ३२ ।। नेवि रवी नभमंडळि येक चि सर्व हि लोक प्रकाशित तेजे ॥ वर्तवितो सकळांप्रति आपण सर्व अलिप्त तसा समधी जे॥ भारत्तोत्तम क्षेत्र-पती तुज सांगितले बुझ क्षेत्र समाने ।। महि क्षेत्रप्रकाशक तो मि असे म्हणती सहने यदराजे ॥ ३३ ॥ यापरि क्षेत्रपती अणि क्षेत्र विचारुनि ज्ञानसुलोचनि पाहे ।। अंतर नेवि रवी-किरणी मृगतोय-अभास जसे पुर वाहे ॥ सर्प दिसे परि दोर खरा प्रकृती-भुत-मोक्ष यथारिति लाहे । जाणति ते परब्रह्मस्वरूप चि चिघन अद्वय पर्वकृपा हे ।। ३४ ॥ तेरावा अध्याय समाप्त. अध्याय १४. सांगतसे भगवंत कृपाघन जे कपिले पटती कथिताहे ॥३३. तस्कर-चोर. १०० कर-किरण.