पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-१३. (९१) भगवद्गीता अध्याय त्रयोदश. देव म्हणे तुज भक्त निरूपण सांगितल्यावरि ज्ञान कथावें ॥ आइक अर्जुन ते कवणेपरि या शरिरास चि क्षेत्र म्हणावे ॥ यास बऱ्या रित नाणतसा तरि तो तितुक्याहुनि भिन्न स्वभावे ।। क्षेत्र तुं जाण तया म्हणिजे दृढ निश्चय होय तसे परिसावें ॥ १ ॥ हे भरतोत्तम सर्व हि क्षेत्र विचारुनि नाणत क्षेत्रपती ही ॥ तो मि असे समजे मजवांचुनि क्षेत्र नव्हे अणि क्षेत्रक्रिया ही ।। क्षेत्रविदां प्रति नाणतसे मणि क्षेत्र हि नाणतसे अवघे ही ।। ज्ञान तयास चि मानितसे मम उत्तम याहुनि यां मत नाहीं ॥ २ ॥ क्षेत्र कसे किति यांत विकार अगोचर गोचरे हो रचिलेसे ॥ कोण न या मिळती मिळती किति विस्तर आइक सर्व हि कैसे ।। हे अवघे तुजला चि निरूपिन सावध होउनि सुस्थिर बसें । पाहति यासि विचारिति फार ऋषी अपुले अपुले मनि ऐसें ॥ ३ ॥ येक म्हणे जिव येक म्हणे शिव पेक म्हणे प्रतीस चि वाना ।। घेक म्हणे मुळकारण ईश्वर येक म्हणे निज कर्म चि नाना ।। ये रितने बहु छंद प्रबंध ऋषी करिती गित गात तनाना ।। ब्रह्मपदी ब्रह्म सूत्र वदे विधि निश्चय क्षेत्र नये अनुमाना ॥ ४ ॥ ते तुज सांगत क्षेत्र कसे तरि पंचभुते अभिमान सहावा ॥ धीजिव आणिक ही करणे दश येक चि ते मन इंद्रिय भावा ।। शब्द श्रुति त्वक स्पर्श दशी रुप नासिक वास रसी रसना पा ।। वाग विलपिन पाणि किया पद चालति मैथुन "सँगै गणावा ।। ५ ।। देखुनियां विषयावरि पोखत लभ्य नव्हे तरि द्वेष पुढारां ॥ आदिविधीमशकांत समान चि ते सख ने सकळांस हि थारा ॥ ६१ क्षेत्र=शेत. ६२. क्षेत्रविद् क्षेत्र जाणणारे. ६३ विकार फेरफार. ६१ अगोचर-अदृश्य, अगम्य. ६५ गोचर-दृश्य, गम्य. ६६ निरूपिन-सांगेम... शिव-परमात्मा. ६८ मरुति-माया. ६९ वाना=वर्णा. ७० प्रबंध ग्रंथ. ०१ पंचभत पृथ्वी, आप, तेज, वाय, व आकाश ही पंचमहाभूतं. यांपैकी घायु हा तीन चार तत्वांनी घटित आहे, आप दोम तत्वांनी घटित आहे व पृथ्वो ६३ तस्वांनी घटित आहे, ह्मणून या तिहींतून प्रत्येकास महामत म्ह० अनेक तत्वघटित पदार्थ असे म्हणतात. आकाशाचा अंत नसल्यामुळे त्याल. महाभूत म्हणतात. तेज ह्याची दाहकशक्ति मोठी असल्यामुळे त्यालाही महाभूत मा ७२ धी-बुद्धो. ७३ करणे=इंद्रिये (करणं साधकतम क्षेत्रगानेंद्रियेषु च ).७० ७५ रसना जीम. ७६ विलापन बोलणे. ७७ सर्ग उत्पत्ति. ७॥ त-ब्रह्मदेवापासून यःकश्चित् घुगुरड्यापर्यंत.