पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवनाथकृत श्रावण आख्यान. दिंडी वृत्त सूर्यवंशी अजराज पुत्र पाहीं । धीर औदार्य सदा सर्वदा ही ॥ पुरी साकेतीं पुण्यग्रामवासी । त्याचि संपत्ती सदा अवीनाशी ॥ १ ॥ पोर्ट नाहीं संतान तया योगे । दिवा रजनी दु:खीत हृदयरोगे ॥ तपाचरणी त्यापुढे काळ गेला । परी नोहे संतान श्रमी झाला ॥२॥ पुढे परिसा वृत्तांत कसा जाला । रात्रि-माजी तो राव सुप्त जाला ॥ तये समयीं त्या स्वप्न काय जाले । तिघां जीवांचे प्राणनाश केले ॥३॥ घाबरोनी तो उठे मनी शंके । वसिष्ठासी प्राथुनी पुसे धाकें ॥ स्वामि याशी वीधान काय कीजे । दुःख निरसाया अभयदान दीजे ॥४॥ मनी बोले तूं वनामाजि जाई । श्वापदांस तिघां मारुनियां येई ॥ हवन करितां अरिष्ठ नाश पाहीं । ऐकुनीयां तो जाय लवलाहीं ॥५॥ तटासीं तो लक्षोनि पाहि कैसे । गुणी योजोनी दूर बैसलासे ॥ उदकपाना लागुनी व्याघ्रहरणी । शशक सूकर येतील ह्याचि ध्यानीं ॥६॥ तये समयीं वृत्तांत काय झाले । तया बोलाया चित्त उदित माले ॥ पुण्यराशी श्रावण भक्तराणा । नरक-त्राता तो पुत्र सत्य जाणा ॥ ७ ॥ मात-पित-सेवेत रत सदाही । तदा वृद्धे बोलती त्यास पाहीं॥ सख्या सत्पुत्रा जरी योग्य होशी। आमा नेत्री दाखवीं क्षेत्र काशी॥ वचन ऐकोनी तदा सिद्ध जाला । स्कधि वाहोनी शीघ्र तो निघाला॥ पर्व जन्माची कथा जाण कैशी । सरितजीवानं ते मत्स्ययोनि ऐशी ॥९॥ उष्ण काली ते उदक शुष्क जाले । मीन अवघे ते पूर्ण सैलिलिं गेले ॥ तेथ किंचित जीवनी मत्स्यबाल । राहतां ही लोटला कांहिं काळ ॥१०॥ एक दिवशी मध्यान्हिं बिंब आले । तदा किरणी ते उदक उष्ण झाले ॥ होय कासाविस बाल तये वेळी । कोण त्राता त्याजला तये काळीं ॥ ११ ॥ कपोत पक्षी पक्षिणी तया स्थानीं । तृषा हरणार्थ येति उदक पानी ।। पान करितां तेधवां जीवेनासी । बाळ बोले ते उभय पक्षियांसी ॥ १२ ॥ उण्ण उदके मम प्राण पहा जाती । विकळ होतो मज कष्ट बहू होती। मला नेऊनी खोल सलिलि सोडा । यया कृत्याने सुकृत-भाग्य जोडा ॥१३॥ संतोषोनी उचलिले तये बाळा । तदा धांवे लगबगां अंतराळा ॥ दैवयोगे तें विघ्न आड आले । वणव्याने आरण्य प्रोसियेले ॥ १४ ॥ १ अयोध्या. २ नदी. 3 पाणी.