पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८०) उद्धवचिघनकृत. सर्व कवीत मि दैत्य गुरू उशेना कवि शुक्र विभूति पहा हो ।। ३ सर्व दमांत मि जो धनदंड जयास्तव सर्व हि लोक भिताती ।। जितिति चार उपाय तयांत मि नीतिरुपे पर जे जिनताती ।। गुह्य तयांत मि मौन सुनिश्चित जेथ 'परादिक शब्दसमाप्ती ।। तत्वविदांत मि ज्ञान तुं जाणसि स्वानुभवें धीर अद्वयशांती ।। ३८॥ ज्या जवळोनि भुते गगनादिक पावति वृद्धिस सर्व भुतांचे ।। बीज मि ते तुज सांगितले तरि यावरि आइक आणिक साचें ॥ ज्या मज वांचुनि स्थावर जंगमरूप नसे अनुप्राणि गणाचे ।। यास्तव जाण वटस्थ सविस्तर वोळख जे निन बीज कणीचे ॥ ३० शत्रु निस्तन अर्जुन हे मम दिव्य विभूति न अंत जयांचा ।। जेवि नभी भवला घन बिंदु अनील असी कवणाप्रति वाचा ।। म्यां कथिल्या तुजलागि विभति सलक्ष शती. न च अंत तयांचा ।। यावरि स्पष्ट कयूं तुजला समजे तरि आइक सावध साचा ।। ४० ॥ भाग्यबळे धनवानबळे निजदेवबळे बहु युक्तिबळे ।। कीर्तिबळे हरिभक्तबळे बघतां अधिकत्व जया अगळे ॥ रूपबळे उरजीतबळे भलते नवशासित तूज कळे ।। पाव खुर्णस तुं नीति असी मम तेथ समद्भव अंश फळे ।। ४१ ।। यापार या बहुता विभती तुज जाणनि काय प्रयोजन पार्था ।। एक अशकुन सर्व हि हे जग व्यापनि राहतसे सम सत्ता ।। जबहु ढीग च साखर गोडिस भेद नसे विवरोनि पहातां ।। अजुन प्रार्थिल ते कवणेपरि विश्वरूपी हरि होईल आतां ।। ४२ ।। दशमोध्यायः समाप्त अध्याय ११. श्रीपतिते विनती करि अर्जन काय किती उपकार वदावा ।। मी जड मूट तरे म्हणुं सांगनि गृह्य हरी हरिला भवगोवा ।। ज हर नारद व्यास शुकादिक स्वानुभवी निजज्ञानविसांवा ।। पावति त्या वचने अवघा मम मोह चि हारपला गुरुदेवा ॥ १ ॥ आइकले अति विस्तर सर्व भुते तुज पासुनि निश्चित होती ।। आणि जसे उदकीं जळबुदबुद लीन तशी तुज मानि समाप्ती ।। - १८ उशना शुक्राचार्य. १९ चार उपाय साम, दान, भेद, दंड. १०० परादिपरा, पश्यती, मध्यमा, वैखरी. १ शत्रुनिरुतन-शत्रुनाशक. २ बबुद-बुडबुडा. ३ लीन लपलेला.