पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/९८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


पडणे अनिवार्य असल्याने व तो अंक बाहेर काढण्याची जबाबदारी त्याची असल्याने कामाच्या या अवघड वेळेत बदल होणे शक्य नाही याची त्याला जाणीव होतीच.तरीही आपल्या बाकी काही मित्रांच्या कामाची सुखावह वेळ पाहून त्याच्या मनात कुठे तरी थोडीशी बोचही होती.ते कामाच्या बाबतीत अत्यंत चोख आणि कष्टाळू होता.उपसंपादकाचं काम त्याला आवडतही होतं.नाइलाजास्तव त्याने हे काम पत्करलं होतं.अशीही परिस्थिती नव्हती.तरीदेखील 'आपण पूर्वी प्रयत्न करून अशी सरकारी नोकरी मिळविली असती तर किती बरं झालं असतं’ असा विचार त्याच्या मनाला चाटून जाणं अगदीच अनैसर्गिक नव्हते.
 हे काही अपवादात्मक उदाहरण नाही.पुराण व इतिहासकाळी युध्ददेखील केवळ दिवसा उजेडीच खेळण्याचा व सूर्य अस्ताला गेल्यानंतर ते थांबवण्याचा नियम होता.तिथे इतर कामे रात्री करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.त्याकाळी एकंदरीतच समाजजीवन आणि व्यक्तिगत जीवनाची गती इतकी धिमी होती की,रात्रीचा दिवस करून'काम'करण्याची आवश्यकता केवळ बाहेरचे नाद असणार्यानाच वाटत असावी.बाकीचे जग 'दिवसा काम आणि रात्री आराम' अशा चाकोरीबध्द,संथ पण आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने योग्य अशा वेळापत्रकानुसार वागत असे.
 गेल्या शंभर वर्षांत काळ बदलला.गेल्या पन्नास वर्षांत तर तो फारच बदलला आणि माणसाला चोवीस तास कमी पडू लागले.पूर्वी दिवसाचे दिवस व रात्र असे दोन भाग होते. आता या दोन्ही भागांना ‘दिवस’ म्हणूनच ओळखले जाते.झपाट्याने होणारा तंत्रज्ञान विकास, उत्पादन वाढ,मानवी गरजांमध्ये झालेली प्रचंड वाढ आणि आलेली विविधता यामुळे सर्व क्षेत्रात काम करणार्यान कर्मचार्यांंनी एकाच वेळी काम करणे व एकाच वेळी विश्रांती घेणे अशक्य झाले आहे.जेव्हा व जिथे वेळ उपलब्ध असेल त्याचा व्यावसायिक कार्यासाठी उपयोग करून घेणे क्रमप्राप्त आहे. त्यामळेच काहींना सकाळी, काहींना दपारी,काहींना रात्री तर काही जणांना या तिन्ही वेळी आळीपाळीने काम करावं लागतं. परिणामी थोड्या लोकांना १० ते ५ अशी आदर्श वेळ लाभत असली तरी बहसंख्य कर्मचार्यांना काहीशा अडचणीच्या वेळी काम करावं लागतं व त्यानुसार आपला दिनक्रम व इतर कार्याची वेळ बदलावी लागते.
 या परिवर्तनातून व्यवस्थापनशास्त्रात ‘कामाचे तर्कशास्त्र'(वर्क लॉजिक) व 'कर्मचाच्यांचे तर्कशास्त्र’(वर्कर्स लॉजिक) या संकल्पना उदयास आल्या.

 रासायनिक पदार्थ तयार करणारा कारखाना चोवीस तास चालू ठेवावा लागतो. अगदी राष्ट्रीय सणांच्या दिवशीही सुटी घेऊन चालत नाही. कारण अशा पदार्थाचे उत्पादन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यात खंड पडल्यास उत्पादनाच्या दर्जावर

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/८९