हे पान प्रमाणित केलेले आहे.
दोन शब्द....
तरुण भारत (बेळगाव) या दैनिकामध्ये रविवारच्या पुरवणीत माझे व्यवस्थापन सदर २००३-२००४ मध्ये प्रसिध्द झाले. याबद्दल मला वाचकांची वेळोवेळी पत्रे आली आणि त्या प्रोत्साहनामुळे हे सदर वाचनीय झाले.
आज इतक्या वर्षांनंतर हे लेख पुन्हा वाचल्यावर लक्षात आले की, ते आजही वाचकांना रुचकर, उपयुक्त ठरतील. औरंगाबाद येथील अग्रणी प्रकाशनाचे प्रकाशक श्री. राजेंद्र वाणी यांनी हे पुस्तक प्रसिध्द करायची जबाबदारी घेतली आणि ते आज वाचकांपुढे येत आहे. त्यांचा मी आभारी आहे.
माझे परम मित्र श्री. किशोर आरास आणि माझी सेक्रेटरी सौ. मोनालिसा इराणी यांनी या पुस्तकावर शेवटचा हात फिरवून त्यात सुधारणा केल्या. त्यांच्याबद्दल येथे आभार व्यक्त करणे योग्य ठरेल.
या सदरांत मूळ इंग्रजी लेखांचा अनुवाद श्री. अजित दाते यांनी केला. कधी कधी मला वाटते की, हा अनुवाद मूळ लेखनापेक्षाही उत्कृष्ट झालेला आहे. तेव्हा शेवटी त्यांचेही आभार.
- शरू रांगणेकर